मुंबई टाइम्स टीम

लॉकडाउन काळात ऑनलाइन गेम्स खेळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात खास करून महिलांचा टक्का वाढलेला दिसत असून, पूर्वी १५ ते २० टक्के असलेलं हे प्रमाण आता जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचलं असल्याचं सांगितलं जातंय. मनोरंजन आणि टाइमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या गेम्सचे अनेक दुष्परिणामदेखील समोर येत आहेत. डोकेदुखी, निद्रानाश, ताण-तणाव यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत असल्याच्या तक्रारीदेखील अनेक महिलांनी केल्या आहेत.

आतापर्यंत ऑनलाइन गेमिंगमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक होतं. पण, लॉकडाउनच्या यावर मोठा परिणाम होत अनेक महिलादेखील ऑनलाइन गेमिंगकडे वळल्याचं चित्र समोर येत आहे. ‘या लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन गेम्सना चांगले दिवस आले असून, गेम खेळणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिलांच्या संख्येत मोठी वाढली आहे. या काळात आमच्या अॅपवरील महिलांची संख्या २० टक्क्यांनी वाढून ३५ टक्क्यांवर आली आहे’, असं एका गेमिंग कंपनीच्या सहसंस्थापकानं सांगितलं. तर, ‘आधी थोड्या महिला पोकरसारखे गेम्स खेळायच्या. पण, लॉकडाउनमध्ये गेम खेळणाऱ्या महिलांची संख्या वाढताना दिसत आहे’, असं आणखी एका गेमिंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं सांगितलं.

गेमिंगमुळे निद्रानाश

पेशाने वकील असलेल्या रिशा यांना लुडो या ऑनलाइन गेमचं व्यसन लागलं असून, त्या तासनतास गेम खेळण्यामध्ये मश्गुल असतात. त्या म्हणतात, ‘सेल्फ क्वारंटाइनच्या काळात मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत असताना मला लुडो गेमबद्दल माहिती मिळाली. आता रात्री गेम खेळता खेळता सकाळ कधी होते हेदेखील कळत नाही.’

कुटुंबाशी वाद

सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या प्रियांका म्हणाल्या, की ‘ऑफिसमध्ये आधी कोणी पब्जी खेळत असलं, की मला चीड यायची. पण, लॉकडाउनदरम्यान माझ्या नवऱ्याबरोबर मी पब्जी खेळले आणि आता तर आम्ही अगदी दररोज न चुकता जोडीनं गेम खेळतो. बऱ्याच वेळेला जेवण बनवण्यावरूनदेखील आमचे वाद होतात. गेम्समध्ये आम्ही इतके गुंग असतो, की शेवटी जेवण बाहेरून ऑर्डर करतो. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या स्नेहा म्हणतात, की ‘मला गेम्स खेळण्याचं इतकं वेड लागलं आहे की गेम खेळताना मी नातेवाइकांच्या कॉल्सकडेही दुर्लक्ष करते.’

नवऱ्याची गेमिंग पार्टनर

स्वत: एक गृहिणी असलेल्या आकृती म्हणाल्या, की ‘मला कोणत्याही मोबाइल गेमबद्दल आकर्षण नव्हतं. पण, लॉकडाउन काळात मी माझ्या नवऱ्याबरोबर काही मोबाइल गेम्स खेळून पाहिले. आता आम्ही दोघं गेममध्ये देखील एकमेकांना पाठिंबा देत असतो.’

गेम्समधून कमाई

काही गेम्समधून थोडी-फार कमाई करण्याची संधी असते. पैसे लावून ऑनलाइन गेम खेळले जातात. त्यामुळे टाइमपास म्हणून सुरू झालेल्या गेमिंगमधून काही जणींनी कमाईसुद्धा सुरू केली आहे. काही गृहिणींनी मनातला राग हलका करण्यासाठी गेमिंगचा आधार घेतला असल्याचं सांगितलं.

महिलांचे सर्वाधिक आवडते गेम्स

लुडो किंग ४९%, पब्जी २१%, कॉल ऑफ ड्यूटी १३%, पोकर १०%, रमी ७%

संकलन – शुभम पाटील

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here