नवी दिल्लीः स्वस्त व कमी बजेट मधील फोन खरेदी करायचा असेल तर Honorच्या ब्रँडवर विश्वास ठेवायला हरकत नाही. ऑनर कंपनीचा या स्मार्टफोनचा आज सेल आहे. कंपनीने ३१ जुलै रोजी या फोनला भारतात लाँच केले होते. या फोनचा आज दुपारी १२ वाजता सेल आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

किंमत आणि ऑफर्स
ऑनरचा नवीन फोन २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, आज दुपारी होणाऱ्या या सेलमध्ये हा फोन केवळ ६ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ग्राहकांना हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगात खरेदी करण्याची संधी आहे. RuPay डेबिट कार्ड आणि UPI च्या मदतीने पेमेंट केल्यास ग्राहकांना सूट मिळते. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर ग्राहकांना ५ टक्के बेनिफिट मिळते. तसेच नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा या फोनवर दिला जातो.

वाचाः

Honor 9S वैशिष्ट्ये
ऑनरच्या या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा LCD IPS स्क्रीन चा रेजॉलूशन 720×1440 पिक्सल्स आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस आणि MediaTek Helio P22 प्रोसेसर दिला आहे. ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. त्यामुळे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

वाचाः

या फोनमध्ये रियर पॅनलवर ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 3020mAh बॅटरी दिली आहे. चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट दिला आहे. या फोनमध्ये गुगल प्ले स्टोर ऐवजी हुवावेची AppGallery मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here