नवी दिल्लीः लॉकडाउनमुळे सरकारी टेलिकॉम कंपनी अर्थात बीएसएनएलची मागणी वाढली आहे. बीएसएनएलची शहरी भागासह ग्रामीण भागात कनेक्टिविटी चांगली आहे. त्यामुळे ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ने ८० दिवसांचा एक स्वस्त प्लान आणल आहे. या प्लानची किंमत दुसऱ्या खासगी कंपन्याच्या तुलनेत कमी आहे.

वाचाः

BSNL च्या या नवीन प्री – पेड प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानध्ये तुम्हाला ८० दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये २५० मिनिट कॉलिंग मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज १ जीबी डेटा सुद्धा मिळणार आहे. या प्लानमध्ये लोकधुन कंटेट सुद्धा फ्री मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे. हा प्लान १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

वाचाः

हे २ प्लान झाले बंद
कंपनीने आपले दोन प्लान बंद केले आहेत. यात ३९९ रुपये आणि १६९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. म्हणजेच हे दोन्ही प्लान उद्या १५ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहेत. तर ३९९ रुपयांचा नवीन प्लान अॅक्टिवेट करण्यात येणार आहे. बीएसएनएलचा नवीन प्लान चेन्नई आणि तामिळनाडून सर्कलमध्ये उपलब्ध आहे. तसेच जे दोन प्लान बंद होणार आहेत. ते सुद्धा या दोन सर्कलमधील आहेत.

वाचाः

काही दिवसापूर्वी बीएसएनएलने चेन्नई सर्कलमध्ये १४७ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लानसोबत ग्राहकांना एकूण १० जीबी डेटा मिळतो. या नवीन प्लान शिवाय कंपनीने २४७ रुपयांच्या प्लान ला अपडेट केले आहे. या अंतर्गत याची वैधता ३६ दिवसांची आहे. याआधी याची वैधता ३० दिवसांची होती. १९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ४३९ दिवासांची करण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here