नवी दिल्लीः चीनची सब ब्रँड कंपनी रेडमीने आपला नवा लॅपटॉप लाँच केला आहे. रेडमीचा हा नवीन लॅपटॉप ऑल मेटेल बॉडीत येतो. लॅपटॉप दिसायला खूप प्रीमियम दिसत आहे. १.०५ किलोग्रॅम वजन असलेल्या या लॅपटॉपची थिकनेस 12.99mm आहे. रेडमीने या लॅपटॉपला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. चीनमध्ये या लॅपटॉपची किंमत ७४८ डॉलर म्हणजेच ५६ हजार रुपये किंमत आहे.

वाचाः

RedmiBook Air 13 चे वैशिष्ट्ये
रेडमीबुक एयर 13 मध्ये 2560×1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत १३.३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो 16:10 के आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. ३०० निट्स च्या ब्राईटनेससोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये 100% sRGB कलर गैमट मिळतात. लॅपटॉपचा डिस्प्ले डिसी डिमिंग फीचरला सपोर्ट करते.

वाचाः

512GB SSD च्या या लॅपटॉपला ८ जीबी आणि १६ जीबी रॅम या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा लॅपटॉप 10th जेनरेशन इंटेल कोर i5-10210Y प्रोसेसर सोबत येतो. कंपनीने लॅपटॉपमध्ये खास ऑल-कॉपर हीट डिसिपेशन आणि ड्यूल आउटलेट डिजाइनचा वापर केला आहे. याला हेवी यूसेज दरम्यान गरम न होण्याचा कंपनीचा दावा आहे.

वाचाः

RedmiBook Air 13 मध्ये 41Wh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ८ तासांपर्यंत बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. लॅपटॉप लवकर चार्ज व्हावा यासाठी कंपनीने 65 वॉट चे यूएसबी-C टाइप चार्जर दिले आहे. लॅपटॉप माइक्रोसॉफ्ट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमसोबत येतो. जबरदस्त कनेक्टिविटी मिळावी यासाठी लॅपटॉपमध्ये WiFi 6 आणि ब्लूटूथ 5.1 सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here