Oneplus ce3 Lite

काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेला हा दमदार कंपनी वनप्लसचाा बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये हवा करत आहे. म्हणजे कमी किंमतीत दमदार फीचर्स हे या फोनचं वैशिट्य आहे. १९,९९९ रुपये किंमत असणारा हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येत असून यामध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रीपल रेअर कॅमेरा, Snapdragon 695 प्रोसेसर असे दमदार फीचर्स आहेत. या फोनची बॅटरीी दमदार अशी 5000mAh इतकी आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
Oppo A78 5G

फ्लिपकार्टवर या ओप्पोच्या फोनची सुरुवाती किम १८,६८० रुपये आहे. हा एक कमी बजेटमध्ये येणारा भारी ५जी स्मार्टफोन आहे. यामध्ये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असणार असून फोनमध्ये ५० मेगापिक्सल ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फोनमध्ये असून 5000 mAh ची दमदार बॅटरी आहे.जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो
Vivo Y56 5G

विवोचा हा डॅशिंग लुकवाला फोन १९,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. ज्यात ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज इतक्या वेरियंटसह येत आहे.फोनमध्ये ५० मेगापिक्सल ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. तसंच भारी सेल्फी घेण्यासाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये आहे. याशिवाय 5000 mAh ची दमदार बॅटरी आहे.जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच
Poco X4 Pro 5G

पोको कंपनीचा हा दमदार ५जी फोन ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मिळत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १९,४९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा दमदार रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा फोनमध्ये आहे. ६.६७ इंचेसचा डिस्प्ले फोनमध्ये आहे. 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh ची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Moto G62 5G

आघाडीची आणि सर्वात जुना असा मोटोरोला कंपनीचा फोनही या यादीत आहे. मोटोने दमदार असा कमी बजेटमधील ५जी फोन लाँच केला असून यामध्ये ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. या वेरियंटची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.या फोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असून ६.५५ इंचाचा डिस्प्ले आहे. तसंच 5000 mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi
Really nice design and style and good subject matter, very little else we need : D.