Airtel 599rs Family Plan : भारतातील एक आघाडीचं नेटवर्क म्हणाल तर एअरटेल आहे. त्यांनी जिओप्रमाणे ५जी नेटवर्कचं जाळं वाढवलं आहे. एअरटेलकडे विविध किंमतीत ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आहेत. एअरटेलचे ग्राहक त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार नवनवीन प्लान निवडू शकतात. जर तुम्हालाही एखादा असा प्लान हवा आहे, ज्यामध्ये तुम्ही एका रिचार्जमध्ये एकापेक्षा अधिक नंबर्सवर विविध सेवांचा लाभ घेऊ शकता. तर एअरटेलने ५९९ प्लॅटिनम फॅमिली प्लान आणला आहे. याला कपल प्लान किंवा फॅमिली प्लान फॉर टू असंही म्हटलं जात आहे. या एका प्लानमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. ज्याामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, ओटीटी आणि डेटाची मजाही मिळणार आहे, तर नेमका हा पोस्टपेड प्लान आहे तरी काय हे जाणून घ्या…

दोन कनेक्शन आणि अनेक फायदे

दोन कनेक्शन आणि अनेक फायदे

एअरटेलचा हा ५९९ प्लॅटिनम फॅमिली प्लान दोन लोकांच्या फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे. यामुळेच याला कपल प्लानही म्हटलं जातं. एअरटेलच्या या ५९९ रुपयांच्या फॅमिली प्लानमध्ये दोन्ही कनेक्शनसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा कंपनीकडून मिळते. ज्यामध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही मोफत मिळतात. तसंच दिवसाला १०० एसएमएसची सुविधाही मिळते.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​महिन्याला एकूण १०५जीबी डेटा मिळणार

​महिन्याला एकूण १०५जीबी डेटा मिळणार

या प्लानमध्ये ग्राहकांना १०५जीबीी डेटा मिळतो. ज्यामध्ये ज्या नंबरवर हा प्लान सुरु आहे म्हणजेच प्रायमरी कनेक्शन जे असेल त्याला एकूण ७५जीबी डेटा मिळतो. याशिवाय अॅड-ऑन कनेक्शनला ३०जीबी डेटा दिला जातो. पण यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे २०० जीबी पर्यंत डेटा-रोलओव्हर ही सुविधा दिली जाते.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

१ वर्षापर्यंत OTT सब्सक्रिप्शन फ्री

-ott-

या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ६ महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप आणि एक वर्षांसाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचं मोबाईल सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये अतिरिक्त फायदा म्हणाल तर हॅँडसेट प्रोटेक्शन, एक्सस्ट्रीम मोबाईल पॅक, हॅलो ट्यून्स आणि विंक प्रिमीयमसारखे बेनिफिट्स मिळणार आहेत. या सर्व सुविधांमुळे हा प्लान एक अगदी दमदार असा एंटरटेनमेंट प्लान बनला आहे.

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​ॲड-ऑन कनेक्शन वाढवण्याची सुविधा

​ॲड-ऑन कनेक्शन वाढवण्याची सुविधा

या एअरटेलप्लानमध्ये तुम्हाला नऊ जास्तीचे नंबर्स जोडण्याची सुविधा देखील एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ५९९ रुपयांचा या फॅमिली प्लान कनेक्शनमध्ये जास्त सुविधा ग्राहकांना मिळत आहेत. तर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही आणखी कनेक्शन अॅड करु शकता. प्रत्येक ॲडऑन कनेक्शनसाठी तुम्हाला २९९रुपये द्यावे लागतील तर प्रत्येक ॲडऑन कनेक्शनला ३० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळू शकते

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा

​अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा

एअरटेल आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करत आहे. त्यामुळे तुम्ही एअरटेल ५जी नेटवर्क पुरवत असलेल्या एखाद्या शहरात असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी 5g डिवाइस वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड ५जी सेवेचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी अतिरिक्त पैसे देखील भरावे लागणार नाहीत.

वाचा : ​Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

1 COMMENT

  1. Valuable information. Lucky me I found your website by accident, and I am shocked why this accident didn’t happened earlier! I bookmarked it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here