Budget smartphones in 15k : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात पण तुमचं बजेट कमी आहे. तर १५,००० रुपयांच्या आत फास्ट चार्जिंगला सपोर्टसारख्या दमदार फीचर्सचे स्मार्टफोन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज मिड-रेंज आणि हाय-एंड सेगमेंटमधील फोनमध्ये फास्ट चार्जिंग हे फीचर दिसून येत आहे. पण अगदी १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनमध्ये हे फीचर शोधणे सामान्य नाही. पण या वर्षी काही ब्रँड्सने आपल्या फोनमध्ये हे फीचर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी परवडणाऱ्या किमतीत 30W पेक्षा जास्त वेगवान चार्जिंग स्पीड दिली आहे. तुम्हाला आता १५,००० रुपयांच्या सेगमेंटमध्ये 44W पर्यंत फास्ट चार्जिंग देणारे फोन सापडतील. तर असेच काही खास फोन्स आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

iQOO Z6 44W

iqoo-z6-44w

iQOO Z6 44W या फोनमध्ये 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशन, आणि 120Hz रिफ्रेश रेटसह ६.५८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. iQOO Z6 44W Android 12 वर आधारित Funtouch 12 वर कार्य करतो. यात Octa Core Qualcomm SM6375 Snapdragon 695 5G (6 nm) प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीही स्टोरेज या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याच्या मागील बाजूस f/1.8 अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा सेंकडरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.0 अपर्चर असलेला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून फोनची किंमत १४,४९९ रुपये आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Vivo T1 44W

vivo-t1-44w

विवोच्या या फोनमध्ये 1080 x 2400 पिक्सेल आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.४४ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित Funtouch 12 वर कार्य करतो. यात Octa Core Qaulcom SM6225 Snapdragon 680 4G (6 nm) प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर फोनच्या मागील बाजूस f/1.8 अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा सेंकडरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये f/2.0 अपर्चरसह १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची सुरुवातीची किंमत १४,४९९ रुपये आहे.

​​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Poco M4 Pro 5G

poco-m4-pro-5g

पोकोच्या या फोनमध्ये ६.६ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करते. यामध्ये Octa Core MediaTek Dimensity 810 5G (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन वेगवेगळ्या वेरियंटमध्ये उपलब्ध असून यामध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज,४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज, ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज तसंच ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस f/1.8 अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चर असलेला ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. समोर f/2.5 अपर्चरसह १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगद्वारे सपोर्टेड आहे.फोनची सुरुवातीची किंमत १२,९९९ रुपये आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Tecno Spark 8 Pro

tecno-spark-8-pro

या फोनचा डिस्प्ले ६.८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2460 पिक्सेल आहे. यात Octa Core MediaTek MT6769Z Helio G85 (12nm) प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित HIOS 7.6 वर काम करतो. फोनच्या ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत केवळ ८,७९९ रुपये आहे . या यादीतील हा सर्वात स्वस्त फोन आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर मागील बाजूस f/1.8 अपर्चरसह १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह २ मेगापिक्सलचा सेंकडरी कॅमेरा आहे.तसंच या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.0 अपर्चरसह ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी आहे.

वाचा : Airtel Couple Recharge : एका रिचार्जमध्ये दोघांची सोय, अनलिमिटेड कॉल्ससह डेटा आणि ओटीटीचीही मजा

Realme Narzo 50 5G

realme-narzo-50-5g

या फोनमध्ये 1080×2408 पिक्सेल आणि 90Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर कार्य करतो. यामध्ये Octa Core MediaTek MT6833P Dimensity 810 (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज आहे.
याच्या मागील बाजूस f/1.8 अपर्चर असलेला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा सेंकडरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.0 अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह चार्ज होते किंमत म्हणाल तर १६,९९९ रुपये असून बँक ऑफर्ससह हा फोन स्वस्तातही घेता येऊ शकतो.

वाचा : ​Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here