नवी दिल्ली : Airtel and Jio Best Mobile : आजकाल इंटरनेट सर्वांसाठी फारच महत्त्वाची गोष्ट झाली आहे. म्हणजे अगदी शाळेतील काही कामांकरता तसंच ऑनलाईन शिक्षणाकरता इंटरनेट लागतं. याशिवाय ऑफिसच्या कामासाठीही आजकाल इंटरनेट लागतं. वर्क फ्रॉम होममुळे आजकाल अनेकजण जमेल तिथून काम करत असतात. दरम्यान या सर्वामुळे मोबाईलमध्ये इंटरनेट महत्त्वाचं झालं असून प्रत्येकाला अधिक डेटा हवा असतो. त्यात रिलायन्स जिओ आणि एअरटेल हे सध्या भारतातील दोन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर आहेत. दोन्ही कंपन्या अमर्यादित डेटा प्रवेशासह अनेक प्रीपेड योजना ऑफर करतात. दोन्ही कंपन्या कमी आणि अधिक अशा गरजांनुसैार डाटा प्लान ऑफर करतात. दोन्ही वापरकर्ते दररोज 2.5GB डेटाचे पॅक ग्राहकांना पुरवत असून या पॅक्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या 2.5GB डेटा देणाऱ्या प्लानमध्ये हा सुरुवातीचा प्लान आहे. ९९९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरासाठी मिळणार आहे. याशिवाय अमर्यादित कॉलिंग देखील यात असून दरदिवसासाछी १०० SMS मिळतात. हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त फायदे म्हणून, Amazon प्राइम मेंबरशिप आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप इत्यादींचा ॲक्सेस ८४ दिवसांसाठी उपलब्ध आहे.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

एअरटेलचा ३३५९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ३३५९ रुपयांचा प्लान

हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानच्या फायद्यांचा विचार केला तर यामध्ये 2.5GB डेटा प्रत्येक दिवसासाठी मिळतो. तसंच अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS देखील या प्लानमध्ये दिले जातात. याच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सदस्यत्व एक वर्षासाठी आणि अपोलो 24|7 सं सब्सक्रिप्शनही आहे

वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो

जिओचा ३४९ रुपयांचा प्लान

जिओचा ३४९ रुपयांचा प्लान

हा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा तसंच अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS समाविष्ट आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, JioCinema, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे सदस्यत्व देखील वापरकर्त्याला मिळत आहे. सध्या JioCinema सध्या IPL 2023 सीझन विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग करत आहे.

वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच

जिओचा ८९९ रुपयांचा प्लान

जिओचा ८९९ रुपयांचा प्लान

जिओाचा हा प्लान ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज वापरासाठी 2.5GB डेटा, दिला जातो. अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS देखील या प्लानमध्ये समाविष्ट आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, JioCinema, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे सदस्यत्व मिळत आहे. ज्यामुळे ओटीटीची मजाही ग्राहकांना मिळणार आहे.

​​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

जिओचा २,०२३ रुपयांचा प्लान

जिओचा २,०२३ रुपयांचा प्लान

या वर्षाच्या सुरुवातीलाच हा प्लान कंपनीने लाँच केला आहे. या प्लानच्या किंमतीप्रमाणे याची वैधताही तगडी आहे. तब्बल २५२ दिवसांची व्हॅलिडिटी या प्लानमध्ये ग्राहकांना मिळते. तसंच वरील प्लान्सप्रमाणे यामध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS समाविष्ट आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV, JioCinema, JioCinema आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे सदस्यत्व देखील वापरकर्त्याला मिळत आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here