राहुल पोखरकर, अनिकेत जाधव

होऊ दे संशोधन

‘ई-बाईक रेसिंग चॅलेंज’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इ-बाइक रेसिंग संघानं इलेक्ट्रिक बाइकची निर्मिती केली होती. येता काळ हा विजेवर चालणाऱ्या वाहनांचा असणार आहे. ‘या क्षेत्रात व्हायचं असेल, तर या वाहनांमध्ये लागणारी बॅटरी आणि मोटर यासारख्या मूलभूत उपकरणांच्या संशोधनावर भर देणं आवश्यक आहे’, असं टीमचा कॅप्टन विद्याभूषण सिंग म्हणतो. तो पुढे सांगतो, की ‘सध्या या वाहनांमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी परदेशातून आयात करावी लागते. परदेशी बनावटीच्या मोटर्सपेक्षा भारतीय मोटर्सची कार्यक्षमता कमी आहे. या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात. या सर्व मूलभूत उपकरणांवर संशोधन करण्यासाठी एखादी प्रयोगशाळा उभारू शकलो आणि या उपकरणांची निर्मिती देशातच करू शकलो तर या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकतो.’

वाचाः

वाचाः

हवेत सुपरकम्प्युटर्स

भारत सरकारनं आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाटनं ‘इस्रो’ या संस्थेनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर ‘नाऊकास्टिंग’साठी मॉडेल तयार केलं होतं. हे मॉडेल ‘मशीन लर्निंग’ या तंत्रज्ञानावर आधारित होतं. नीरज चौधरी याबाबत सांगतो, की ”मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध असलेल्या डेटा, अर्थात माहितीवर योग्य पद्धतीनं प्रोसेसिंग करणं गरजेचं असतं. ते प्रोसेसिंग योग्य पद्धतीनं आणि जलद करू शकतील असे सुपरकम्प्युटर्स काही मोजक्या शिक्षण संस्था आणि खासगी संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. ‘मशीन लर्निंग’ क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर अशा प्रकारच्या सुपरकम्प्युटर्सची संख्या वाढवायला हवी. या तंत्रज्ञानाशी निगडित संशोधन साहित्य, रिसर्च पेपर्स, व्हिडीओ लेक्चर्सचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे.’

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here