Best Gaming Laptops in Market : तुम्हाला जर गेमिंगसाठी अर्थात दमदार गेम्स खेळण्यासाठी लॅपटॉप हवा असेल तर दमदार प्रोसेसर आणि चांगले ग्राफिक्स असलेला लॅपटॉप हाच बेस्ट असतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही दमदार गेमिंग लॅपटॉप्सबद्दल सांगत आहोत. हे लॅपटॉप सध्या सेलमध्ये कमी किमतीतही उपलब्ध आहेत. Amazon वर सध्या सुरू असलेल्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेजमुळे हे हे लॅपटॉप्स मोठ्या सवलतीत मिळतील. चांगल्याप्रकारे गेमिंग करता यावी यासाठी यामध्ये अधिक रॅम आणि 4GB पर्यंतचं ग्राफिक कार्ड देखील दिलं गेलं आहे. स्मूथ गेमिंग परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉप्समध्ये उत्तम दर्जाचा डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. या गेमिंग लॅपटॉप्सचा प्रोसेसर खूप पॉवरफुल आहे, जो गेमिंग व्यतिरिक्त ऑफिसच्या कामासाठी देखील वापरला जाऊ शकतो. चलातर पाहुया या लॅपटॉप्सची यादी…

ASUS TUF गेमिंग A15 गेमिंग लॅपटॉप (किंमत ४९,९९० रुपये)

asus-tuf-a15-

Asus कंपनी गेमिंग लॅपटॉप तयार करण्यात आघाडीवर आहे. दरम्यान Asus च्या TUF सिरीजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हा एक बजेट रेंजमधील लॅपटॉप आहे. चांगल्या कामगिरीसाठी, याला 144hz च्या रिफ्रेश रेटसह स्क्रीन मिळत आहे. ज्यामुळे हा लॅपटॉप गेमिंगसाठी बेस्ट आहे. यात ग्राफिक्स कार्ड ही 4GB चं देण्यात आलं आहे. कंपनी हा अप्रतिम लॅपटॉप गेम पाससह विकत असल्यामुळे तुम्ही यावर १०० हून अधिक उच्च दर्जाचे गेम खेळू शकता.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

HP Victus AMD Ryzen 5 5600H गेमिंग लॅपटॉप (किंमत ५९, ९९० रुपये)

hp-victus-amd-ryzen-5-5600h-

गेमिंगसाठी अगदी योग्य असणाऱ्या या लॅपटॉपमध्ये तुम्हाला १५.६ इंचाच्या आकाराची मोठी स्क्रीन दिली जात आहे. यामध्ये फुल एचडी पिक्चर क्वालिटी उपलब्ध आहे. हा HP गेमिंग लॅपटॉप ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी SSD स्टोरेजसह येत आहे. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला बॅकलिट कीबोर्डही देण्यात आला असून आयपीएस डिस्प्लेसह हा लॅपटॉप येत असून यात ग्राफिक्स कार्ड देखील आहे. गेम खेळण्याव्यतिरिक्त फोटो एडिटिंगसाठीही याचा वापर करता येईल.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Acer Aspire 5 गेमिंग लॅपटॉप (किंमत ५९,९९० रुपये

acer-aspire-5-

हा 12 Core प्रोसेसर असलेला गेमिंग लॅपटॉप आहे. ज्यामुळे हा लॅपटॉप वापरताना फास्ट स्पीड मिळते. या लॅपटॉपमध्ये 4GB ग्राफिक्स कार्ड ही देण्यात आले आहे, ज्यामुळे गेमिंग परफॉर्मन्स अधिक जलद होतो. दमदार प्रोसेसरमुळे या लॅपटॉपसह गेमिंगचा अनुभव जबरदस्त मिळतो. यात १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळत असल्याने हा लॅपटॉप तुम्हाला सर्वोत्तम गेमिंग परफॉर्मन्स देऊ शकतो.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

MSI Katana GF66 गेमिंग लॅपटॉप (किंमत ६०,५३०)

msi-katana-gf66-

MSI कंपनीचा हा MSI Katana GF66 गेमिंग लॅपटॉप

144hz च्या रिफ्रेश रेटसह येणारा लॅपटॉप 12व्या पिढीच्या I5 प्रोसेसरसह येत आहे. यामध्ये तुम्हाला Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. याशिवाय Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह हा लॅपटॉप सुसज्ज आहे. यात 4GB ग्राफिक्स कार्डही आहे. यात विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे अॅक्शनबेस्ड गेम खेळण्यासाठी योग्य आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

डेल गेमिंग लॅपटॉप G15 5525 (किंमत ७३,२९०)

-g15-5525-

हा डेल गेमिंग लॅपटॉप २५० निट्स ब्राइटनेससह येत आहे. या लेटेस्ट लॅपटॉपमध्ये, तुम्हाला एक जबरदस्त परफॉर्मन्स प्रोसेसर मिळत आहे. हा लॅपटॉप तुम्हाला सर्वोत्तम गेमिंग अनुभव देऊ शकतो. विशेष म्हणजे यामध्ये SSD स्टोरेज असल्याने भारी अनुभव युजरला मिळू शकतो. यात ४जीबी ग्राफिक्स कार्डसह १६जीबी रॅम आहे, गरज पडल्या स ती वाढवता येऊ शकते. हे 120hz च्या रिफ्रेश रेटसह फुल एचडी डिस्प्लेसह येत आहे.

वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं का

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here