Realme Narzo N55 (किंमत- १०,९९९ रुपये)

बजेट फोन तयार करण्यात हातखंडा असणाऱ्या रिअलमी कंपनीचा हा
Realme Narzo N55 एक भारी लूक्समध्ये येणारा भारी फोन आहे. हा स्मार्टफोन ६.७२ इंच फुल एचडी डिस्प्ले सह येत आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. याला 33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी दिली गेली आहे. प्रिमियम डिझाईनसह येणारा हा स्मार्टफोन 680 nits चा कमाल ब्राइटनेस देतो. हा स्मार्टफोन ७.९८ mm अल्ट्रा स्लिम आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Samsung Galaxy M14 5G (किंमत – १४,९९९ रुपये)

सॅमसंगचा हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येत आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा एलसीडी फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1080×2408 रेझोल्यूशन दिलं आहे. हा स्मार्टफोन १ वर्षापर्यंतच्या वॉरंटीसह कंपनी विकत आहे. बॅटरीचं म्हणाल तर 6000 mAh ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून ड्युअल सिम सपोर्टसह सुपर फास्ट 5G तंत्रज्ञान या फोनमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ३० मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
Nokia G21 Android Smartphone (किंमत – १२,९९९ रुपये)

नोकियाचा हा फोन ६.५ इंच स्क्रीनसह येत असून रिफ्रेश रेट 90 Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल एआय कॅमेरा या फोनमध्ये उपलब्ध आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज मिळेल, जे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येईल. ड्युअल सिम सपोर्टसह या फोनमध्ये साईड फिंगर प्रिंट आणि फेस अनलॉकची सुविधा ही आहे. यात 5050 mAh इतकी बॅटरी दिली गेली आहे.
Redmi 11 Prime 5G (किंमत- १२,९९९ रुपये)

रेडमीचा हा एक दमदार डिझाईनसह येणारा स्मज फ्री टेक्सचर असलेला 5G स्मार्टफोन आहे. प्रीमियम लुक असलेल्या या स्मार्टफोनमध्ये साइड फिंगर प्रिंट सेन्सरसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देखील उपलब्ध आहे. या फोनला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असून MIUI 13 ऑपरेटिंग सिस्टमसह हा फोन येतो. या स्मार्टफोनला ४ जीबी रॅम देण्यात आला आहे.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
Tecno Spark 10 5G (किंमत – १४,९९९ रुपये)

Tecno Spark 10 5G हा एक लूकमध्ये अगदी उत्कृष्ट असा स्मार्टफोन आहे. यामध्ये 5G सेल्युलर तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनला २५६ जीबी स्टोरेज मिळत आहे. यात ५० मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा मिळत आहे. यामध्ये हाय स्पीड डेटा कनेक्टिव्हिटी, 5000 mAh ची बॅटरी ही देण्यात आली आहे. मॅट ब्लॅक व्यतिरिक्त, मॅट ब्लू आणि मॅट व्हाइट रंगांमध्ये देखील हा फोन उपलब्ध आहे.
वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं का
Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi
cheapest online pharmacy india – https://pharmacyindia.pro/#
world pharmacy india – https://pharmacyindia.pro/#