​स्मार्टफोन चार्जिंगची काळजी घेणं

​स्मार्टफोन चार्जिंगची काळजी घेणं

स्मार्टफोन चार्ज करतानाही काळजी घ्यावी लागते. कारण अतिचार्जमुळेही फोन खराब होऊ शकतो. दरम्यान हेच कारण आहे की जेव्हाही तुम्ही स्मार्टफोन चार्ज करण्यास सुरुवात कराल तेव्हा त्याची विशेष काळजी घ्या. स्मार्टफोनला जास्त वेळ चार्ज करून ठेवल्याने त्याचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्मार्टफोन चार्ज करता तेव्हा त्याचा चार्जिंग कालावधी लक्षात ठेवा.

​वाचा : आता WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, इन्स्टाग्रामसारखं खास फीचर लवकरच येणार

स्मार्टफोनवर गेम खेळतानाही घ्या काळजी

स्मार्टफोनवर गेम खेळतानाही घ्या काळजी

स्मार्टफोनवर गेम्स खेळताना तुम्हाला फोनची विशेष काळजी घ्यावी लागते. सतत गेमिंग केल्याने तुमचा फोन खराब होऊ शकतो. म्हणूनच फोनवर गेमिंगच्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. सतत गेमिंगचा थेट परिणाम फोनच्या मदरबोर्डवर होतो. तसेच तुम्ही फोनवर कोणता गेम खेळता यावरही ते अवलंबून असते. अधिक हेवी गेम्स अधिक काळ खेळल्याने फोनचं नुकसान होऊ शकतं.

वाचा : आता मानवी मेंदूत चिप बसवता येणार, एलन मस्‍कच्या न्‍यूरालिंक कंपनीला USFDA ची मंजूरी

स्मार्टफोन कुठे ठेवतो तेही पाहणं गरजेचं

स्मार्टफोन कुठे ठेवतो तेही पाहणं गरजेचं

स्मार्टफोन वापरताना, सर्वप्रथम तो आपण आपल्याकडे नसताना इतरवेळी कुठे ठेवतो , ते देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे चार्जला लावताना, झोपताना किंवा इतर कामं करत असताना फोन ओल्या जागी ठेवणं धोक्याचं ठरु शकतं. फोन भिजला तरी फोन खराब होऊ शकतो. कारण ओलाव्यामुळे फोनचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फोन वापरता तेव्हा या गोष्टीचीही काळजी घ्या.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवणं धोक्याचं

फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवणं धोक्याचं

वाढता उकाडा पाहता प्रखर सूर्यप्रकाशात कॅमेरा वापरणं धोकादायक आहे. उन्हाळ्यात कॅमेऱ्याचा वापर उन्हाळ्यात मर्यादित असावा. सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढणे हे देखील फोन हिट होण्याचे प्रमुख कारण बनते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फोन अधिक तापल्याने फोनचा मदरबोर्ड किंवा डिस्प्ले देखील बर्न करू शकते. सूर्यप्रकाशात कॅमेऱ्याचा अतिवापर केल्याने आयफोनची स्क्रीनच खराब झाली आहे अशी उदाहरणेही आपण पाहिली आहेत. तसंच अनेक मोबाईल वापरकर्ते असे आहेत, जे त्यांच्या फोनमध्ये अनेक अॅप्लिकेशन्स डाउनलोड करतात. यातील अनेक अॅप्स असे आहेत की ते दीर्घकाळ वापरले जात नाहीत. या सर्वामुळे फोन तापतो, त्यामुळे मर्यादित अॅप्स ठेवावी.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

बॅकग्राऊंडमध्ये सुरु ॲप्सवरही लक्ष ठेवा

बॅकग्राऊंडमध्ये सुरु ॲप्सवरही लक्ष ठेवा

स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अॅप्लिकेशन आपण वापरतो. अनेकदा आपण थेट होम बटण दाबून या अॅप्समधून बाहेर येतो. पण पूर्णपणे क्लोज न केल्याने हे अॅप मागे बॅकग्राऊंडला सुरु असतात ज्यामुळे फोन तापू शकतो. तसंच कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अनेक नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी सेवा एकाच वेळी सक्रिय असतात. यामध्ये मोबाईल डेटा, लोकेशन, जीपीएस, ऑटो सिंक हे पर्याय बॅकग्राउंडमध्ये ऑन राहतात. ही फीचर्स मोबाइलमध्ये प्रोसेसर सतत सुरु ठेवतात आणि प्रोसेसरवर जास्त भार पडल्यास किंवा बॅटरी कमी झाल्यास ते फोनसाठी अधिक हाणीकारक ठरतं.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here