अनुपम भाटवडेकर

लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत. यावर्षी करोनाच्या संकटामुळे बहुतेक जणांना आपल्या गावी किंवा नातेवाईंकांकडे जाणं शक्य नाही. पण, अशा वेळी ज्यांच्या घरी विराजमान होणार आहेत ते टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय करु शकतात. ते कसं हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या…

विविध अॅप्लिकेशन्सचे व्हिडीओ कॉल्स किंवा लाइव्ह फिचर वापरून ऑनलाइन दर्शन घडवता येईल. हे करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा…

वाचाः

– कॅमेऱ्याची जागा निश्चित करून ठेवावी.

– त्यासाठी ट्राय-पॉड किंवा स्टँडची सोय करावी.

– पुरेसा प्रकाश आहे ना हे बघावं.

– निश्चित केलेल्या ठिकाणापासून गणपती मूर्ती व्यवस्थित दिसेल ना याची खात्री करुन घ्यावी.

– व्हिडीओ कॉल्ससाठी लावलेल्या सेटअपचा गणपतीची पूजा किंवा आरती करताना अडथळा होणार नाही ना हे पाहावं.

गणपतीचं लाइव्ह दर्शन घडवण्यासाठी पर्याय पुढीलप्रमाणे…

वाचाः

इन्स्टाग्राम

खास गणेशोत्सवासाठी एक नवीन अकाऊंट बनवून त्या अकाऊंटने लाइव्ह जाता येईल. लाइव्ह गेल्यावर फॉलोअर्सना तुम्ही लाइव्ह आहात याचं नोटिफिकेशन जातं. त्यामुळे ते तुमच्याशी थेट संवादसुद्धा साधू शकतात. हल्लीच आलेल्या अपडेटमुळे हे लाइव्ह व्हिडीओ आयजीटीव्हीमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

वाचाः

फेसबुक रूम

मे महिन्यात फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘फेसबुक रुम’ हे फिचर आणलं. हे फिचर वापरून आपल्या सर्व मित्रांबरोबर किंवा ठरावीक लोकांबरोबर लाइव्ह व्हिडीओ करता येतो. मीटिंगची लिंक शेअर करून त्यांना या रूममध्ये अॅड करता येतं. तुम्ही तत्काळ लाइव्ह न जाता थोड्या वेळानं जाणार असाल तरीही फेसबुक रूम तयार करून ठेवता येते. विशेष म्हणजे फेसबुक अकाऊंट नसणारेसुद्धा यात सहभागी होऊ शकतात.

गुगल मीट

गुगल हँगाऊट या व्हिडीओ कॉलिंग अॅपचं आधुनिक व्हर्जन म्हणजे गुगल मीट. एप्रिल २०२०पर्यंत हे अॅप फक्त जी सूट युजर्ससाठी उपलब्ध होतं. पण, आता गुगल अकाऊंट असणारी कोणतीही व्यक्ती हे अॅप्लिकेशन वापरू शकते. अधिकृत संकेत स्थळाचा वापर करु शकता किंवा अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध असलेल्या अॅपचा वापर करु शकता. आपल्या गुगल अकाऊंटने साइन इन करून मीटिंग सुरु करू शकतो किंवा एखादी मीटिंग शेअर केलेल्या लिंकने जॉइन करू शकतो. मीटिंग चालू असताना इतरांना अॅडही करता येतं.

युट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंग

जर तुमचे युट्यूब चॅनेल असेल आणि तुम्ही युट्यूबच्या बेसिक क्राएटेरियामध्ये बसत असाल तर तुमच्या चॅनलला फोन नंबर व्हेरिफाय करून लाइव्ह स्ट्रीमिंगच्या पर्यायाचा वापर करु शकता. या लाइव्ह स्ट्रीमिंगची लिंक फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावरसुद्धा शेअर करता येते. या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये माइक आणि कंमेंट्स बंद करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

पेरिस्कोप

सोशल मीडिया अकाऊंट वापरून ट्विटरच्या अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन करता येतं. हे अॅप्लिकेशन मोबाइल फ्रंट/बॅक कॅमेरा सोबतच थर्ड पार्टी जसं की, गो-प्रो कॅमेरासुद्धा सपोर्ट करतं. तुम्हाला कोणाबरोबर लाइव्ह व्हिडीओ शेअर करायचा आहे हे सुद्धा ठरवू शकता. म्हणजे तुम्ही एखादा ग्रुप तयार करून केवळ त्यांच्या करता लाइव्ह स्ट्रीमिंग करू शकता किंवा सगळ्यांबरोबरही ते शेअर करू शकता. हे व्हिडीओज साइटवर २४ तास राहतात.

जिओ मीट

हे अॅप्लिकेशन साधारणपणे गुगल मीट सारखंच काम करतं. यामध्ये एका वेळी शंभर जण मीटिंग करू शकतात. या अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीटिंग शेड्यूल करून इतर लोकांसोबत लिंक शेअर करू शकता. जिओ मीट गुगल प्ले स्टोर, अ‍ॅपल अ‍ॅप्स स्टोर, विंडोज आणि मॅक ओएस यावर उपलब्ध आहे.

वरील अॅप्लिकेशन्स वापरून सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करू शकतो. या अॅप्लिकेशन्स बरोबरच नेहमीच्या व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, गुगल ड्युओ हे अॅप्स वापरूनही मर्यादित लोकांबरोबर व्हिडीओ कॉल करून त्यांना गणपतीचं लाईव्ह दर्शन घडवता येऊ शकेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here