नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी जबरदस्त पुनरागमनासाठी तयारीत आहे. चायनीज उत्पादनावर बहिष्काराची मागणी जोर धरू लागल्याने मायक्रोमॅक्स याचा फायदा उठवण्याच्या तयारीत आहे. यावेळी कंपनीला सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या पीएलआय स्कीमचा फायदा सुद्धा मिळणार आहे. पुढील महिन्यात नवीन डिव्हाईस लाँच करण्याची शक्यता आहे. नवीन फोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.

वाचाः

अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये हे सांगितले आहे की, मायक्रोमॅक्स पुढील महिन्यात नवीन स्मार्टफोन लाँच करु शकतो. यात समावेश असलेल्या बजेट किंमतीवरून १५ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये हेही म्हटले की, कंपनी या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक हीलियो चिपसेट देऊ शकते. तसेच लेटेस्ट अँड्रॉयड व्हर्जन वर लाँच केला जावू शकतो.

वाचाः

बऱ्याच महिन्यांपासून कंपनीचा फोन लाँच नाही
कंपनीचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली. अधिकृत घोषणा करण्याआधी मायक्रोमॅक्स आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर नवीन फोन्सला टीझ करीत आहे. मायक्रोमॅक्सने गेल्या काही दिवसांपासून नवीन डिव्हाईस लाँच केले नाही. जुन्या फोनच्या आधारावरच कंपनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

वाचाः

प्रीमियम फीचर्स मिळणार
मायक्रोमॅक्सकडून अखेरचा स्मार्टफोन iOne Note लाँच करण्यात आला होता. या फोनला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात बाजारात उतरवले होते. या फोनला ग्राहक अजूनही खरेदी करीत आहेत. ऑनलाइन लिस्टिंगमध्ये या फोनची किंमत ८ हजार १९९ रुपये आहे. मायक्रोमॅक्स कंपनीने अँटी चायना ट्रेंडचा फायदा मिळू शकतो. कंपनी नवीन फोनमध्ये प्रीमियम फीचर्स देण्याची शक्यता आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here