तरुणांमध्ये सध्या ऑनलाइन डेटिंगची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. यात सुरुवातीला रिक्वेस्ट पाठवली जाते, मग ऑनलाइन गप्पा रंगतात आणि नंतर प्रत्यक्ष भेट घेतली जाते. पण, यामध्ये फसवणुकीचे प्रकारही घडताना दिसताहेत. स्वत:विषयी खोटी माहिती देणं किंवा फोटो एडीट करुन टाकणं असे गैरप्रकार यामध्ये होत असतात. यात आता भर पडली आहे ”ची. करताना समोरच्याला इस्प्रेस करण्याच्या नादात खोटी माहिती सांगणं, प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी रंगवून, वाढवून स्वत:विषयी सांगणं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कसं ज्ञान आहे असं भासवणं, याला ‘वोकफिशिंग’ म्हणतात. लॉकडाउनच्या काळात याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं.
ऑनलाइन डेटिंगमध्ये व्हर्च्युअली वेळ घालवला जातो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती कशी दिसते याबद्दल खरी माहिती नसते. फक्त मतं आणि आवडीनिवडी जुळत आहेत की नाहीत हे बघितलं जातं. नंतर रात्रं-दिवस आवडीनं चॅटिंग केलं जातं. कित्येकदा चालू घडामोडींबद्दल आपल्याला किती माहीत आहे किंवा आपल्याकडे खूप ज्ञान आहे, असं यात भासवलं जातं. समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी बढाया मारल्या जातात. हे सगळं खरं आहे असं समजून विश्वास ठेवणारी व्यक्ती वोकफिशिंगला बळी पडते. प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्यामुळे ऑनलाइन काहीही सांगितलं, तरी काय बिघडणार आहे? असा विचार करून चुकीची माहिती दिली जाते. पण, यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीची फसवणुक करत आहात, याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा फसवणुकीच्या प्रकारांमध्ये लॉकडाउनच्या काळात वाढ झाली असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
प्रकार कोणते?
ऑनलाइन डेटिंग विश्वातील पुढीलप्रमाणे
० कॅटफिशिंग- चित्रपटातलं किंवा एखाद्या काल्पनिक पात्रासारखं व्यक्तिमत्त्व आहे असं भासवणं.
० किटनफिशिंग- आपण किती सकारात्मक वृत्तीचे आहोत असं दाखवणं.
० हॅटफिशिंग- स्वत:मधली एखादी कमतरता लपवणं.
ऑनलाइन डेटिंग करताना समोरच्या व्यक्तीत भावनिकरित्या गुंतणं होतं. समोरची व्यक्ती खरोखर कशी असेल, याचं टेन्शन असतं. अशात फसवणूक झाली, तर त्याचे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतात. परिणामी, इतरांवरील विश्वास कमी होतो. प्रसंगी एखादी व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते.
– गौरी योहान-कोठारी, मानसोपचारतज्ज्ञ आणि रिलेशनशिप एक्सपर्ट
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.