नवी दिल्लीः भारती एअरटेल कंपनीने आपले दोन प्लान म्हणजेच १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लान देशभरात लागू केले आहे. या दोन्ही प्लान्सला काही निवडक सर्कलमध्ये सर्वात आधी लागू करण्यात आले होते. गेल्या महिन्यात याला काही सर्कलमध्ये वाढवण्यात आले होते. परंतु, आता लेटेस्ट ऑफर अंतर्गत एअरटेलचे १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे हे दोन्ही प्लान देशभरातील कोणत्याही सर्कलमधून रिचार्ज केले जावू शकतात. दोन्ही प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानसोबत हाय स्पीड डेटासोबत अनिलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.

वाचाः

सर्वात आधी टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टमध्ये एअरटेलचे १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्लान्स सर्व २३ सर्कलमध्ये जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जुलै मध्ये टेलिकॉम कंपनीने १ टेलिकॉम सर्कलमध्ये म्हणजेच दिल्ली एनसीआर, आसाम, बिहार, झारखंड, मुंबई, नॉर्थ ईस्ट आणि ओडिशा सोबत गुजरात, हरियाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, यूपी ईस्ट, यूपी वेस्ट, उत्तराखंड, आणि पश्चिम बंगाल मध्ये हे प्लान उपलब्ध करण्यात आले होते.

वाचाः

आता नवीन बदल करीत १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे रिचार्ज प्लान आंध्र प्रदेश, तेलंगाना, चेन्नई, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, पंजाब, आणि तामिळनाडू सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

१२९ रुपयांचा प्रीपेड प्लान
१२९ रुपयांचा एअरटेलचा प्रीपेड प्लानमध्ये १ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा फायदा कंपनी देते. या प्लानमध्ये ३०० SMS ऑफर करते. या पॅकची वैधता २४ दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः वाचाः

१९९ रुपयांचा
१२९ रुपयांच्या प्लानप्रमाणे १९९ रुपयांच्या प्लानची वैधता सुद्धा २४ दिवसांची आहे. यात १ जीबी डेटा रोज मिळतो. ग्राहकांना रोज १०० एसएमएस मिळतात. रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग बेनिफिट मिळते. या दोन्ही प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रिम आणि विंक म्यूझिक, हेलो ट्यून्स फ्री मिळते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here