स्वस्तात मस्त स्मार्टफोन अनेकांना खरेदी करायचे असतात. भारतात अशा फोनला खूप मागणी आहे. त्यामुळे कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहे. भारतीय बाजारात जबरदस्त कॅमेरा आणि खास वैशिष्ट्यांची अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. देशात एन्ट्री लेवल स्मार्टफोन्सची डिमांड सुद्धा तितकीच वाढताना दिसत आहे. ग्राहकांना कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचे असतात. त्यामुळे भारतात असे अनेक ग्राहक आहेत जे स्वस्तात स्मार्टफोन खरेदीच्या शोधात असतात. ज्यात व्हॉट्सअॅप पासून फेसबुक आणि कॅमेरा असे गरजेचे अॅप्स फोनमध्ये मिळायला हवेत. या स्वस्त फोनमधून युजर्स व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि अन्य करमणुकीच्या साधनाचा वापर करीत असतात. इंडियन मार्केटमध्ये सध्या असे काही स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्या स्मार्टफोनची किंमत ५ हजारांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या या स्मार्टफोन विषयी….

चीनची कंपनी शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Go आहे. या फोनची किंमत २९९९ रुपये आहे. फोनमध्ये तुम्हाला ५ इंचाचा 720p डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये १ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. फोन अँड्रॉयड Oreo Go एडिशनवर काम करतो. यात हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम सह ७ भाषेचा सपोर्ट मिळतो. यात ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी मिळते.

मेड इन इंडिया कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेली कंपनी मायक्रोमॅक्सचा Micromax Canvas Spark हा स्मार्टफोन ५ हजारांपेक्षा कमी किंमतीचा फोन आहे. या फोनमध्ये १ जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेज आणि १.३ गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 2,000mAh ची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. स्वस्तात मस्त फोन खरेदी करायचा असेलत तर अनेकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कूलपॅडच्या Coolpad Mega 5M या स्मार्टफोनची किंमत ४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, १.३ गीगाहर्ट्ज प्रोसेसर, १ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये फोटोग्रासीठी ५ मेगापिक्सलचा रियर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 2,000mAh बॅटरी दिली आहे. तुमचं बजेट ५ हजारांपेक्षा कमी असेल तसेच तुम्हाला फीचर फोन ऐवजी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर कूलपॅडच्या Coolpad Mega 5M हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हा एक फोन मॉडर्न डिझाइनचा असलेला फोन आहे. तसेच या फोनची किंमत ४ हजार ८९९ रुपये आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि स्लीम बेजल्स दिले आहेत. या फोनमध्ये ५.५ इंचाचा आयपीएस डिस्प्ले, १.३ गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर, २ जीबी पर्यंत रॅम आणि १६ जीबीचा इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 2,500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

आयटेलच्या Itel A23 या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा FWVGA डिस्प्ले आणि 1.4GHz क्वाड कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १ जीबीचा रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 2,050mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये २ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. अनेक युजर्स कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदीच्या शोधात असतात. याठिकाणी दिलेल्या स्मार्टफोनच्या यादीवर नजर टाकल्यास हे सर्व फोन ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here