नवी दिल्लीः जगभरात आलेल्या करोना व्हायरसमुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. करोनामुळे अनेक बदल पाहायला मिळत आहेत. भारतातील शहरी लोक करोना महामारी दरम्यान मोबाइल वरून पुन्हा एकदा डेस्कटॉपकडे स्थलांतरीत (वळले) होत आहेत. कारण, देशातील हजारो लोक सध्या वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करीत आहेत. त्यामुळे मोबाइलवरून डेस्कटॉपवर स्थलांतरीत होत असल्याचे ईटी टेकने आपल्या न्यूजमध्ये म्हटले आहे.

भारतासाठी गुगलकडून मिळालेली माहिती अशी आहे की, डेस्कटॉपचे महत्त्व मार्च महिन्यापासून वाढले आहे. मार्च महिन्यात पहिल्यांदा भारतात लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. आता हा आकडा १०० वर पोहोचला आहे. जून आणि जुलै महिन्यात दोन वेळा हा आकडा पाहिला गेला आहे. हा आकडा गेल्या १२ ते १३ ऑगस्ट रोजी शोधलेला शब्द विष्लेषणावर आधारित होता. यात सर्वात मोठे योगदान हे देशातील तीन शहराचे होते. ते म्हणजे तिरुवनंतपूरम, बेंगळूरू आणि नोएडा या शहराचा आहे.

गुगलच्या शोधामध्ये भारतात उपलब्ध आकडेवारीवर एक नजर टाकल्यास डेस्कटॉपसाठी मायक्रोसॉफ्ट टीम, टेलिग्राम वेब आणि डेस्कटॉपसाठी गुगल मीटिंग फॉर डेस्कटॉप या पाच ब्रेकआउट प्रश्नांला जोडलेले शब्द होते. हा सर्व डेटा गुगल ट्रेंड्स इंडियावर उपलब्ध आहे.

अॅप किंवा मोबाइल आधी इंटरनेट कंपन्यांनी ईटीशी बोलताना सांगितले की, शहरात वेब ट्रॅफिक प्री लॉकडाउनच्य़ा तुलेनेत खूप वाढली आहे. डेस्कटॉ गेल्या काही वर्षापासून घसरणीच्या मार्गावर होता. परंतु गेल्या काही महिन्यापासून डेस्कटॉप ट्रॅफिक मध्ये खूप मोठी सुधारणा झाली आहे, अशी माहिती ई-कॉमर्स फ्लिपकार्ट कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

स्पूटीफाईच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये शहरी भागात ३७ टक्के वाढ झाली आहे. आपल्या अॅप्लिकेशन्सच्या डेस्कटॉप विभागात युजर्संची शहरी भागात नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत एप्रिल आणि जूनमध्ये ७ टक्के वाढ झाली असल्याची माहिती म्यूझिक स्ट्रिमिंग सर्विसच्या एका प्रवक्त्याने दिली आहे.

अँथ्रोपोलोजिस्ट गायत्री सप्रू यांनी सांगितले, शहरी भारतीय पीसी आणि लॅपटॉप यासारखे कायम उपकरणावर अधिक वेळ व्यस्त करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या प्रमाणे लोक स्क्रीनचा वापर करीत आहे. त्याला वाचण्यासाठी किंवा शेयर करण्यासाठी कंटेटला खूप सोपे जात आहे.

डिजिटल मीडिया कंपन्या या बदलाला पहिल्यांदा पाहत आहेत.

साधारणपणे, व्यावसायिक न्यूजच्या खपामुळे बऱ्याचदा डेस्कटॉपचे आकर्षण असते. लॉकडाउननंतर जीवनशैली, गॅझेट्स आणि मनोरंजन उत्पादनाने आपल्या डेस्कटॉपची ट्रॅफिकच्या शेयर मध्ये १०-१५ टक्के वाढ केली आहे. टाइम्स इंटरनेटचे उपाध्यक्ष (रिवेन्यू स्ट्रॅटेजी अँड अनालिटिक्स) यांनी सांगितले की, डिजिटल विभागात टाइम्स ग्रुपशिवाय द इकोनॉमिक्स टाइम्सचा समावेश आहे.

व्हर्लूप, ग्राहकांच्या मदतीने स्वतंत्र प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स आणि फिनटेक यासारखे अॅप आधीच व्यवसायासाठी आणि मोबाइल सपोर्ट प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांची संख्या ७० टक्के प्री लॉकडाउननंतर कमी होऊन ती ५४.८३ झाली आहे. फिनटेकचे संस्थापक गौरव सिंह यांनी सांगितले की, ग्राहकांनी डेस्कटॉपचा इकॉमर्ससाठी लॉकडाउनमध्ये वापर केला. तसेच मोबाइलपेक्षा सपोर्ट तिकिटासाठी डेस्कटॉपचा वापर जास्त करण्यात आला आहे.

डिजिटल मीडियाचे प्लॅनर हेही सांगत आहेत की, वर्क फ्रॉम होम करताना उत्पादन वाढवण्यासाठी शहरी लोक मोबाइलवरून डेस्कटॉकडे वळताना दिसत आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here