Bajaj LEDZ 9W Rechargeable Emergency Inverter LED Bulb (किंमत – ५७५ रुपये)

हा इन्व्हर्टर एलईडी बल्ब एक भारी क्वॉलीटीचा बल्ब आहे. या इमर्जन्सी बल्बमध्ये बिल्ट इन रिचार्जेबल बॅटरीही दिली जात आहे. ज्यामुळे हा बल्ब आपोआप चार्ज होतो. दीर्घकाळ टिकणारा हा एलईडी बल्ब वीजही कमी वापरतो. हा 900lm रिचार्जेबल बल्ब असून कोणत्याही खोलीत वापरता येतो. ४ तास वीज नसतानाही खोली यामुळे प्रकाशित राहु शकते. हा ऊर्जा बचत करणारा आणि अतिशय कार्यक्षम एलईडी बल्ब आहे.
वाचा :स्वस्तात iPhone घेण्याची संधी, ३२ हजारपेक्षाही कमी किंमत, Amazon वर सुरु आहे ऑफर
PHILIPS Stellar Bright Rechargeable Emergency Inverter LED Bulb (किंमत – ३२९ रुपये)

या ८.५ वॅट एलईडी बल्बची क्रिस्टल व्हाईट लाइटनिंग अगदी बेस्ट आहे. हा इमर्जन्सी इन्व्हर्टर एलईडी बल्ब असून B22 बेससह येत आहे. याची वैशिष्ट म्हणाल तर आरामदायक ब्राइटनेससह बल्ब, फ्लिकर फ्री लाइटनिंग, ऊर्जा कार्यक्षम बल्ब असून काही वेळात हा बल्ब चार्ज होऊ ४ तासांपर्यंत बॅकअप देखील देतो.
वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो
Halonix Prime 12W B22D Inverter Rechargebale Emergency Led Bulb (किंमत – ३९९ रुपये)

या टॉप ब्रँडेड एलईडी बल्बमध्ये पावरफुल लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. हा बल्ब तुम्ही घरी, दुकानात किंवा कुठेही वापरण्यासाठी घेऊ शकता. यावर ६ महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे.
लाँग लाईफ बॅटरीसह हा बल्ब वीजही वाचवतो. हा LED बल्ब १० तासात पूर्ण चार्ज होतो. हा बल्ब एकदम बेस्ट प्रकाश देऊ शकतो.
वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन
Wipro 9W B22D LED White Emergency Bulb (NE9001) (किंमत – ३८९ रुपये)

हा देखील एक चांगला रिचार्जेबल बल्ब आहे. या एलईडी बल्बला युजर रेटिंग ४ स्टार आहे. हा बल्ब 2200mAh इनबिल्ट बॅटरीसह येतो. दमदार व्होल्टेज या बल्बमध्ये दिलं असून यामुळे हा खूप दीर्घकाळ टिकतो.
वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब
CINEFX 18W USB Charging Waterproof LED Rechargeable Bulb (किंमत- ३९९ रुपये)

CINEFX या कंपनीचा हा देखील एक दमदार बल्ब असून हा 18W चा एलईडी बल्ब आहे. या एलईडी बल्बमध्ये रिचार्जेबल बॅटरीही दिली जात आहे. यात 2000mAh ची बॅटरी देखील आहे, जी दीर्घकाळ ब्राइटनेस देते. या बल्बमधून शक्तिशाली प्रकाश येतो. याला एक usb सॉकेट देखील आहे. हे मल्टी लाइटनिंग मोडसह येत आहे, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. हा एलईडी बल्ब पोर्टेबल तसेच अतिशय कार्यक्षम आहे.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi