नवी दिल्लीः जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी २८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंत वैधता असलेले प्लानची सुविधा देते. एका वर्षाचे प्लान फायदेशीर असतात दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून सुटका होते. तसेच छोट्या वैधतेपेक्षा हे प्लान स्वस्त सुद्धा असतात. जाणून घ्या प्लानविषयी.

वाचाः

जिओचा २३९९ रुपयांचा प्लान
जिओचा ३६५ दिवसांची वैधता असलेला हा स्वस्त प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा एकूण ७३० जीबी मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच युजर्संना रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः

जिओचा २५९९ रुपयांचा प्लान
हा प्लान २३९९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. परंतु, यात जास्त सुविधा मिळतात. यात रोज २ जीबी डेटा शिवाय १० जीबी डेटा अतिरिक्त मिळतो. याप्रमाणे एकूण डेटा ७४० जीबी डेटा वापरता येतो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज शंभर एसएमएस तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते.

वोडाफोनचा १४९९ रुपयांचा प्लान
वोडाफोनचा सर्वात स्वस्त एक वर्षाची वैधता असलेला प्लान आहे. यात ग्राहकांना डेटा लिमिटमध्ये मिळतो. ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये युजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस मिळतात. तसेच वोडाफोन प्ले आणि झी५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वाचाः

वोडाफोनचा २३९९ रुपयांचा प्लान
हा ३६५ दिवसांचा दुसरा प्लान आहे. यात रोज १.५ जीबी डेटा मिळतो. युजर्संना एकूण ५४७.५ जीबी डेटाचा वापर करता येतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. तसेच वोडाफोन प्ले व झी ५ चे सब्सक्रिप्शन मिळते.

एअरटेलचा १४९८ रुपयांचा प्लान
एअरटेलचा प्लान वोडाफोनसारखाच आहे. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटाचा वापर करता येतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस मिळतात. यात एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते.

वाचाः

वाचाः

एअरटेलचा २३९८ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या प्लानमध्ये १.५ जीबी रोज मिळतो. ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये एकूण ५४७.५ जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. तसेच या शिवाय एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here