​Apple’s Reality Pro हेडसेटची मोठी चर्चा

apples-reality-pro-

या वर्षीच्या WWDC साठी सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे Apple हेडसेट. हे डिव्हाईस नक्की येणार की नाही याबद्दल अजून नेमकं काही समोर आलं नसलं तरी याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या अॅपलच्या पहिल्या-वहिल्या हेडसेटमध्ये “XROS” नावाची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाईल असे म्हटले जात आहे. हेडसेट गेमिंग, वर्कआउट इत्यादीसाठीबेस्ट असेल. याची किंमत तब्बल ३ हजार डॉलर्सच्या घरात असू शकते.

​वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

M2 पावर्ड MacBook Air 15 इंच

m2-macbook-air-15-

MacBook Air हा ॲपलचा अत्यंत मागणी असलेला लॅपटॉप आहे, जो त्याच्या कॉम्पॅक्ट १३ इंच स्क्रीन आकारासाठी ओळखला जातो. यापूर्वी, Apple ने ११ इंच मॉडेल देखील ऑफर केले होते, परंतु ते खूप पूर्वी बंद झाले होते. अलीकडील माहितीनुसार आता नवीन मॉडेल, M2 चिपद्वारे समर्थित आणि १५ इंच स्क्रीन असणारे असेल जे आज समोर येऊ शकते.

​वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

iPhones साठी iOS 17

iphones-ios-17

Apple च्या आगामी iOS 17 अपडेटमध्ये स्मार्ट-होम डिस्प्ले मोड आणि नवीन जर्नलिंग अॅप असे बरेच फीचर्स असतील. हे पॉइंट अँड स्पीक आणि लाइव्ह स्पीच सारख्या नवीन दमदार फीचर्ससह सादर होऊ शकते. सिरी या व्हाईस असिस्टंटमध्येही बरेच कामाचे अपडेट्स होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​​वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

​Apple ARVR हेडसेटसाठी xrOS

apple-ar/vr-xros

Apple च्या आगामी हेडसेट सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मला “xrOS” म्हणतात. यात एक खास अशी होम स्क्रीन असणार असून ती युजर्सना व्हर्च्युअल स्पेसमध्ये अनेक अॅप्स ऑपरेट करण्याची सुविधा देईल. हे हेडसेट कंपनीच्या सर्व iPad ला सपोर्टेड असतील असंही म्हटलं जात आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​iPadOS 17

ipados-17

iPadOS 17 मध्ये देखील आयफोनच्या iOS 17 सारखेच अनेक फीचर्स असणार आहेत. ज्यात स्मार्ट-होम डिस्प्ले मोड, जर्नलिंग अॅप आणि अॅप्स साइडलोड करण्याची सुविधा तसंच यात मूड-ट्रॅकिंग करु शकणारे एक हेल्थ अॅपही असेल. PadOS मध्ये येणारे इतर वैशिष्ट्य म्हणजे iOS प्रमाणे लॉक स्क्रीन कस्टमाइझ करण्याचा पर्याय असेल.

​वाचाः Amazon Sale: स्कूल चले हम! लॅपटॉपपासून प्रिंटर आणि इतर प्रोडक्ट्सवर दमदार डिस्काउंट, पाहा टॉप ५ डिल्स

​macOS 14

macos-14

macOS च्या आगामी अपडेटला “Mammoth” म्हटले जाऊ शकते. MacOS किंवा tvOS 17 साठी कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत, कारण Apple iOS, iPadOS आणि watchOS वाढवण्यावर आणि त्या फीचर्सना macOS मध्ये एकत्रित करण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे.
​वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या हे Rechargeable Bulb, ‘या’ साईटवर मिळतेय खास डिल

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here