नवी दिल्लीः डेलचा नवा लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. डेलच्या या लॅपटॉपची ग्लोबल लाँचिंग मे महिन्यात करण्यात आली होती. याआधी गेल्या महिन्यात कंपनीने Dell XPS 14 आणि XPS 15 ला भारतीय बाजारात उतरवले होते. Dell XPS 17 मध्ये बेजललेस डिस्पले आहे. तसेच कार्बन फायबर की बोर्ड डेकचा सपोर्ट आहे. हा लॅपटॉप कलर एक्यूरेट डिस्प्ले सोबत येतो. क्रिएटिव लोकांसाठी हा खास बनवला आहे.

वाचाः

Dell XPS 17 ची भारतात किंमत
भारतात Dell XPS 17 ची किंमत २ लाख ९ हजार ५०० रुपये आहे. ही किंमत बेस मॉडलची आहे. ज्यात १० वे जनरेशनचे इंटेल कोर आय७ प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबीचे स्टोरेज मिळणार आहे. लॅपटॉपची विक्री अॅमेझॉन इंडिया, डेल इंडिया आणि डेल स्टोर्सवरून सुरू आहे.

वाचाः

Dell XPS 17 चे खास वैशिष्ट्ये
डेलच्या या लॅपटॉपमध्ये विंडोज १० होम मिळणार आहे. या लॅपटॉपमध्ये १७.० इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. ज्याचे रिझॉल्यूशन 1920×1200 पिक्सल आहे. डिस्प्ले मध्ये अँटी लेवल ग्लेयरचा सपोर्ट दिला आहे. याचा ब्राईटनेस ५०० निट्स आहे. लॅपटॉपचा डिस्प्लेला तुम्ही अल्ट्रा एचडी (3840×2160 पिक्सल) मध्ये बदलू शकतो. यात इंटेलचे १० वे जनरेशन कोर आय ७ 10750H प्रोसेसर मिळणार आहे.

वाचाः

या शिवाय यात Nvidia GeForce GTX 1650 Ti ग्राफिक्सल, 8GB DDR4 रॅम आणि 512GB ची एसएसडी स्टोरेज मिळणार आहे. लॅपटॉप मध्ये 2.5W स्टेरियो स्पीकर आणि 1.5W चा स्टेरियो ट्विटर्स आहेत. यात 97Wh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1, चार थंडरबोल्ट 3 पोर्ट्स, फुल साइज एसडी कार्ड रिडर, 3.5 एमएम चा हेडफोन/मायक्रोफोन जॅक दिला आहे. लॅपटॉप चे वजन 2.1 किलोग्रॅम आहे. या लॅपटॉपमध्ये फेसआयडी लॉगिन सुद्धा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here