जॉब सर्च करु नका

जॉब सर्च करु नका

ऑफिसच्या कम्प्युटरवर चुकूनही नवीन जॉब सर्च करु नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तसंच जर एचआर किंवा व्यवस्थापनाला याबद्दल माहिती मिळाली, तर तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला नोकरी गमवावी देखील लागू शकते.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

ऑनलाइन सर्चिंग

ऑनलाइन सर्चिंग

अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काही लोकांना फक्त कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी देखील ठेवले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट देता आणि काय शोधता याची माहिती तुमच्या कंपनीला मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसच्या आयटी टीमला याची पूर्ण माहिती असतेच, त्यामुळे ऑनलाईन सर्चिंग करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

​वाचा : आता मानवी मेंदूत चिप बसवता येणार, एलन मस्‍कच्या न्‍यूरालिंक कंपनीला USFDA ची मंजूरी

ऑनलाइन शॉपिंग

ऑनलाइन शॉपिंग

आपण ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जात असतो, मजा-मस्ती नाही, त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगसारखी विरंगुळ्याची कामं करणं चुकीचचं आहे. त्यामुळे ऑफिस कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तुमचं ऑनलाईन शॉपिंग करणं तुम्हाला महाग पडू शकतं.

वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

खाजगी चॅट करु नका

खाजगी चॅट करु नका

आजकाल प्रत्येक कंपनीत गुगल चॅट किंवा व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्सवर कर्मचाऱ्यांमध्ये चॅटिंग होत असते. पण या ठिकाणी तुम्ही खाजगी चॅट करु नये कारण हे चूकुन तुमचा एखादा मेसेज ऑफिस चॅट ग्रुपवर देखील जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो.

​वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण याद

पर्सनल फाईल्स ॲक्सेस करु नका

पर्सनल फाईल्स ॲक्सेस करु नका

तुम्ही तुमच्या कोणत्यागी खाजगी फाईल्स शक्यतो ऑफिस कम्प्युटरवर सेव्ह करु नका, कारण असं केल्याने तुमच्या खाजगी फाईल्स या लीक होण्याची भिती असते. तसंच मेल आयडी देखील पर्सनल न वापरता ऑफिसचाच वापरावा.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here