जगभरात आज वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा (world photography day 2020) केला जात आहे. अनेकांना फोटोग्राफीची आवड असते. परंतु, अनेकांकडे चांगला कॅमेरा नसल्याने फोटो काढू शकत नाहीत. महागडा कॅमेरा घेण्याची अनेकांची ऐपत नसते. त्यामुळे अनेकांना आपल्या पसंतीला बाजुला ठेवावे लागते. परंतु, आता निराश होण्याचे कारण नाही, तुमचे बजेट १५ हजारांपर्यंत असेल तसेच तुम्हाला फोटो काढण्याची हौस असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला १५ हजारांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोनची यादी देणार आहोत. या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही बेस्ट पिक्सर्स काढू शकता. तसेच तुमची फोटोग्राफीची आवड जोपासू शकता. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे असल्याने आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनची यादी या ठिकाणी देत आहोत, जाणून घ्या या स्मार्टफोन्सविषयी…

शाओमीच्या रेडमी नोट ९ (Xiaomi Redmi Note 9) हा स्मार्टफोन खरेदी करुन तुम्ही तुमच्या फोटोग्राफीची आवड जोपासू शकता. हा फोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ११,९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३,९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४,९९ रुपये आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे.

शाओमीपासून वेगळा होवून स्वतंत्र ब्रँड झाल्यानंतर पोकोने सर्वात स्वस्त फोन Poco M2 Pro लाँच केला. ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४,९९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६,९९९ रुपये आहे. पोकोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा वाइड अँगलचा कॅमेरा दिला आहे. तसेच २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनला जबरदस्त बॅटरी बॅकअप 5020mAh सुद्धा दिला आहे. फास्ट चार्जिंगसाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

चीनची कंपनी रियलमीने भारतात नुकतेच दोन स्मार्टफोन लाँच केले. त्यातील एक म्हणजे Realme C15 स्मार्टफोन जबरदस्त आहे. रियलमी सी १५ च्या ३ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत १० हजार ३०० रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ३०० रुपये आहे. रियलमीच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. स्वस्तात मस्त किंमतीत हा फोन खरेदी करून आपली फोटोग्राफीची आवड आपण जोपासू शकता.

सॅमसंग कंपनीने M सीरीज अंतर्गत या फोनला भारतात लाँच केले आहे. ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा कॅमेरा ५ मेगापिक्सलचा दिला आहे. सेल्फी प्रेमींसाठी सॅमसंगने या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये मध्ये तब्बल ६ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी एम २१ मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. त्यामुळे या फोनमधून जबरदस्त फोटोग्राफी करता येवू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here