फक्त गुगल पे देत आहे ही सुविधा

फक्त गुगल पे देत आहे ही सुविधा

Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे सध्या कोणतेही UPI पेमेंट अॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPI पेमेंट अॅपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, परंतु गुगल पे वापरताना तुम्ही आता फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने ऑथिंटिकेशन करु शकता.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

मोबाईल क्रमांक आधार आणि बँकशी लिंक असणं आवश्यक

मोबाईल क्रमांक आधार आणि बँकशी लिंक असणं आवश्यक

आधार क्रमांकासह Google Pay वापरण्यासाठी, तुमचा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडला असलेला पाहिजे आणि मोबाइल क्रमांकही हा आधार कार्डशी देखील जोडला असलेला पाहिजे. Google Pay ची ही सुविधा सध्या फक्त काही बँकांसाठी उपलब्ध आहे परंतु लवकरच ती सर्व बँकांसाठी जारी केली जाईल.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

कसं कराल सेटअप?

कसं कराल सेटअप?

तर आधार कार्डने गुगल पे सेट अप करण्यासाठी, प्रथम Play Store किंवा Apple च्या App Store वरून Google Pay अॅप डाउनलोड करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. तेथे तुम्हाला डेबिट कार्ड व्यतिरिक्त आधार क्रमांकाचा पर्याय दिसेल. आता आधार कार्डच्या पर्यायावर क्लिक करा आणि OTP टाकून पुढे जा.

वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

पिन करावा लागेल जनरेट

पिन करावा लागेल जनरेट

एकदा तुम्ही OTP टाकला की त्यानंतर, तुम्हाला एक पिन विचारला जाईल जो Google Pay अॅपसाठी असेल म्हणजेच तुम्ही जेव्हाही Google Pay द्वारे पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला हा सहा अंकी पिन आवश्यक असेल. त्यामुळे हा पिन लक्षात ठेवणं फार जास्त गरजेचं असणार आहे.

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

बँक खातं सिलेक्ट करा

बँक खातं सिलेक्ट करा

एकदा तुम्ही तुमचा युनिक पिन सेट केला की तो पिन सेट केल्यानंतर, तुमचा आधार क्रमांक ज्या देखील बँक खात्याशी लिंक आहे ते बँक खाते Google Pay वर दिसेल. मग तुम्हाला बँक खातं सिलेक्ट कराव लागेल. त्यानंतर आता फायनली तुम्ही गुगल पे आरामात वापरू शकाल.

​वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here