नवी दिल्लीः Google ची ईमेल सर्विस डाउन सुरू आहे. जगभरात गुगल युजर्सकडून तक्रारी येत आहेत. जीमेल युज करताना काही तासांपासून समस्या येत आहे. युजर्संनी सांगितले की, जीमेल मध्ये आलेल्या या समस्यांमुळे युजर्संना ई-मेल पाठवण्यास तसेच फाईल अटॅच करण्यास समस्या येत आहे. डाउन डिटेक्टरच्या रिपोर्टनुसार, जीमेल मध्ये आलेल्या या समस्येमुळे जगभराप्रमाणे भारतीय युजर्संना सुद्धा या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

वाचाः

गुगल ड्राईव्हमध्ये ही अडचण
काही रिपोर्ट्समध्ये गुगल ड्राईव्ह सुद्धा डाऊन झाल्याचे म्हटले आहे. रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार काही युजर्संना गुगल ड्राईव्ह करताना फाइल शेयर करताना समस्या येत आहे. तसेच काही युजर्संनी गुगल ड्राईव्ह फाइल डाऊनलोड आणि गुगल ड्राईव्हमध्ये फाईल अपलोड करण्यास समस्या येत असल्याचे म्हटले आहे.

वाचाः

वाचाः

गुगलकडून तपास सुरू
गुगलच्या स्टेटज पेजच्या माहितीनुसार, याचा तपास सुरू आहे. तसेच लेटेस्ट अपडेटनुसार, गुगल मीट, गुगल व्हाइस आणि गुगल डॉक यासारख्या सर्विस युज केल्याने अडचण येत आहे. तसेच काही युजर्स यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करू शकत नाहीत. त्यांनाही अडचण येत आहे.

वाचाः

वाचाः

गेल्या महिन्यातही आली होती ही समस्या
गेल्या महिन्यात दोन वेळेस ही समस्या आली होती. गुगलच्या या प्रसिद्ध सर्विसमध्ये अडचण आली होती. गुगलच्या अकाउंटला लॉग इन करण्यास युजर्संना अडचण येत असल्याचे युजर्संनी म्हटले होते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here