​Adobe Premiere Rush

adobe-premiere-rush

कोणत्याही प्रकारची एडिटिंग असेल तर Adobe चे सॉफ्टवेअर अगदी बेस्ट असतात. त्यामुळे फोटो एडिटिंग वेळी ​Adobe Premiere तसंच
Adobe Lightroom यासह व्हिडीओ एडिटिंगमध्ये Adobe Premiere Rush हे एक भारी अॅप आहे. विशेष म्हणजे ह ेAndroid, iOS तसेच डेस्कटॉप अशा सर्वव प्लॅटफॉर्मवर वापरता येते. त्याचा युजर इंटरफेसही अगदी सोपा आहे. फुटेज ड्रॅग आणि ड्रॉप करणे, कलर ठिक करणे, म्युझिक किंवा व्हॉइसओव्हरमध्ये मिसळणे अशी सारी कामं सोपी होतात.

​वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​LumaFusion

lumafusion

तुम्हाला अगदी सिंपल इंटरफेससह व्हिडिओ एडिटिंग अॅप हवं असेल तर LumaFusion हा तुमच्यासाठी भारी पर्याय आहे. हे व्हिडिओ एडिटिंग अॅप डेस्कटॉप व्हिडिओ एडिटिंगसाठीही वापरता येईल. यात संपूर्ण नॉन-लिनियर एडिटिंग टूल्स आहेत, ज्याचा वापर अवघड प्रोजेक्टसाठी देखील केला जाऊ शकतो. यात मल्टी-ट्रॅक एडिटिंग आहे. वेगवेगळ्या इफेक्ट्सनी हे अॅप सज्ज आहे .
​वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Quik

quik

तुम्ही GoPro वापरत असल्यास, तुम्ही तुमचे फुटेज एडिट करण्यासाठी Quik अॅप देखील वापरून पाहू शकता. हे अॅप तुम्हाला GoPro डिव्हाइसेसचे व्हिडीओ एडिट करण्यासाठी बेस्ट आहे. AI तंत्रज्ञानावर काम करणारं हे अॅप ऑटोमेटिकली देखील व्हिडीओ एडिट, म्युझिक असं सारं काही करुन देतो. व्हिडिओ एडिट केल्यानंतर तुम्ही तो थेट इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब इत्यादींवर देखील अपलोड करू शकता. हे अॅप ‘स्मार्ट एडिट्स’ फंक्शनसह येते.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​Kinemaster

kinemaster

आणखी एक दमदार एडिटिंग ॲपम्हणजे KineMaster. हे ॲप तुम्हाला iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे.तसंच फोन किंवा टॅब्लेट दोन्हीवर एडिंटिग करता येणार आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर, ब्लेंडिंग मोड, क्रोमा-कीइंग आणि ऑडिओ मिक्सिंग असे खास फीचर्स यात आहेत. सद्यस्थितीला Kinemaster एक बेस्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप्सपैकी एक आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​Filmora

filmora

फिल्मोरा हे देखील एक चांगलं आणि वापरण्यासाठी सोपं व्हिडिओ एडिटिंग अॅप आहे. Filmora Android आणि iOS साठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगसह सर्व बेसिक साधने उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं असल्यास व्हिडिओ ट्रिम आणि स्प्लिट देखील करू शकता, व्हिडिओचा वेग कमी जास्त करणे, क्लिपचा क्रम बदलणे आवाज नियंत्रित करणे हे सारं या अॅपवर करता येणार आहे.

​वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here