​Apple iPhone 14 सिरीजवर डिस्काउंट

apple-iphone-14-

Apple iPhone 14 वर तब्बल ११,९९१ रुपयांचं डिस्काउंट मिळत असून त्यामुळे त्याची किंमत ६७,९९९ रुपये झाली आहे. हा फोन A15 बायोनिक चिपसेटद्वारे सपोर्टेड असून ६.१ इंचाचा डिस्प्ले आहे. हा हँडसेट ड्युअल 12MP रेअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. तसंच Apple iPhone 14 Plus वर १२,९९१ रुपये सवलत मिळत असून त्यानंतर त्याची किंमत ७६,९९९ रुपये झाली आहे. या फोनमध्येही Apple A15 Bionic चिपसेटअसून यात ६.७ इंचाचा डिस्प्ले आहे आणि ड्युअल 12MP रेअर कॅमेरा सेटअप आहे.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

​Apple MacBook Air M1

apple-macbook-air-m1

या सेलमध्ये उपलब्ध आणखी एक दमदार प्रोडक्ट म्हणजे Apple MacBook Air M1 या मॅकबुकवर तब्बल २५००० रुपयांची सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे २५ हजारांच्या सवलतीनंतर ७४,९९० (बँक ऑफरसह) मध्ये उपलब्ध
आहे. MacBook Air M1 मध्ये १३.३ इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे आणि तो Apple M1 चिपसेटने सपोर्टेड आहे. हा लॅपटॉप 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​Apple AirPods 2nd Genration

apple-airpods-2nd-genration

अॅपलचे लेटेस्ट ​Apple AirPods 2nd Genration देखील या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे. यावर ४,९९१ रुपयांची सवलत मिळत आहे. या सवलतीनंतर याची किंमत ९,९९९ रुपये इतकी झाली आहे. वायरलेस चार्जिंग केस असलेल्या Apple AirPods मध्ये वेगवान आणि स्टेबल वायरलेस कनेक्शन मिळतं. Apple ची स्वतःची H1 हेडफोन चिप आहे. TWS इअरबड्समध्ये अॅपलच्या आयकॉनिक स्टेम डिझाइनचे वैशिष्ट्य यात आहे. याची बॅटरी लाईफही भारी आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​Apple Watch SE 2nd Generation

apple-watch-se-2nd-generation

Apple कंपनीची स्मार्टवॉच घेणाऱ्यांसाठीही खास ऑफर या सेलमध्ये आहे. ​Apple Watch SE 2nd Generation वर ६,९०१ रुपयांची सवलत मिळत आहे. या डिस्काउंटनंतर याची किंमत २५,९०० रुपये (बँक ऑफरसह) इतकी होत आहे. या Apple Watch SE 44mm मध्ये GPS व्हेरिएंट मल्टिपल वर्कआउट मोड, स्लीट ट्रॅकिंग आणि बऱ्याच फीचर्ससह येतो.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Apple iPad वरही डिस्काउंट​

apple-ipad-

या सेलमध्ये ​Apple iPad वरही डिस्काउंट आहे. यामध्ये Apple iPad 10.2-inch दोन हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर २८,९९० रुपयांना उपलब्ध आहे. iPad 10.2 इंच Apple A13 Bionic चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे आणि ते 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येते. हे 8MP वाइड बॅक कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेऱ्यासह सुसज्ज आहे. याशिवाय Apple 2021 iPad Mini वर ५,९०१ रुपयांच डिस्काउंट मिळत असून त्यानंतर त्याची किंमत ४३,९९९ रुपये इतकी झाली आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Apple चार्जिंग अॅक्सेसरीजवरही ऑफर

apple-

Apple 20W USB-C पॉवर अडॅप्टर ३३० रुपयांच्या सवलतीनंतर १५७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे पॉवर अॅडॉप्टर सर्व आधुनिक iPhone, AirPods आणि iPad मॉडेल्सशी सुसंगत आहे. तसंच iPhones साठी Apple MagSafe चार्जर ६५१ रुपयांच्या सवलतीसह ३,८४९ रुपयांना मिळत आहे. Apple MagSafe चार्जर iPhone 11 नंतर सर्व iPhones (iPhone SE 3rd Gen वगळता), AirPods Pro, Apple Watch आणि AirPods वायरलेस चार्जिंग केसला सपोर्टेड आहे.

वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here