नवी दिल्लीः सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे एक जबरदस्त संधी आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. या फोनची किंमत आता फक्त ८ हजार ३९९ रुपये करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये हा फोन याच किंमतीत विकला जात होता. परंतु, कंपनीने आता ही किंमत कायम केली आहे.

वाचाः

स्मार्टफोनची नवी किंमत अॅमेझॉन आणि सॅमसंगची अधिकृत वेबसाइट वर सुद्धा अपडेट करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे प्रसिद्ध रिटेलर महेश टेलिकॉमने सुद्धा किंमत कमी करण्यात आल्याचे ट्विट केले आहे. या स्मार्टफोनला कंपनीने ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते.

वाचाः

Samsung Galaxy M01चे खास वैशिष्ट्ये
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत ५.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनचे रिझॉल्यूशन 1520×720 पिक्सल आहे. फोन अँड्रॉयड १० वर आधारित OneUI वर काम करतो. यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबीचा इंटरनल स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर आणि फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन तीन कलरमध्ये म्हणजेच ब्लॅक, ब्लू आणि रेज या तीन रंगात उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here