वाचाः
किंमत आणि ऑफर्स
Realme Narzo 10A चे दोन व्हेरियंट्स उपलब्ध आहे. पहिला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. दोन कलर मध्ये ब्लू आणि व्हाईट मध्ये हा फोन खरेदी करता येवू शकतो. या फोनच्या खरेदीवर बँक ऑफर्स देण्यात येत आहे. तसेच काही डिस्काउंट ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर्स सुद्धा मिळत आहे.
वाचाः
Realme Narzo 10A चे फीचर्स
या फोनमध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1600×720 पिक्सल्स आहे. तसेच फोनला सेफ्टी म्हणून कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड Realme UI सोबत येतो. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो.
वाचाः
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा मेन सेन्सर शिवाय २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times