​Amazon Prime Day सेल कधी?

​Amazon Prime Day सेल कधी?

तर हा बहुप्रतिक्षीत Amazon Prime Day 2023 सेल दोन दिवस चालणार असून १५ जुलै रोजी सुरु होणारा हा सेल १६ जुलै 2023 पर्यंत चालेल. भारतातील Amazon प्राइम डे सेलची ही सातवी आवृत्ती आहे. हा कंपनीच्या ‘सर्वात मोठ्या वार्षिक सेल’पैकी एक आहे. या प्राइम डे सेलमध्ये प्राईम सदस्यांसाठी खास ऑफर्स असणार आहेत.

​वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

​नवीन स्मार्टफोन, गॅझेट्स आणि बरचं काही

​नवीन स्मार्टफोन, गॅझेट्स आणि बरचं काही

अॅमेझॉन प्राइम डे सेल हे मोठ्या ब्रँड्ससह लहान ब्रँड्सचे प्रोडक्ट्सही विकणार आहे. यावेळी अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच होणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Amazon प्राइम डे सेलमध्ये OnePlus, iQOO, Realme Narzo, Samsung, Motorola, boAt, Sony, Allen Solly, Lifestyle, Titan, Fossil, Puma, Tata, Dabur यांसारख्या ४०० हून अधिक ब्रँड्सचे नवीन फोन लाँच केले जातील.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

८० टक्क्यांपर्यंत मिळेल सूट

८० टक्क्यांपर्यंत मिळेल सूट

अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज अशा साऱ्यावर ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. फॅशनवर म्हणजेच कपड्यांवर ८०% पर्यंत सूट असेल. स्मार्ट टीव्हीवर सवलत ६०% पर्यंत जाईल. Amazon Pay संबधितही काही खास ऑफर्स असून याच्या मदतीने फास्ट हॉटेल, फ्लाईट बुकिंग करता येणार आहे.

​वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा

​क्रेडिट आणि डेबिट कार्डच्याही खास ऑफर्स​

​क्रेडिट आणि डेबिट कार्डच्याही खास ऑफर्स​

प्राइम डे दरम्यान, युजर्सना ICICI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि ICICI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड्स आणि SBI क्रेडिट कार्ड्सवर EMI व्यवहारांवर अतिरिक्त १०% सूट मिळू शकते.
तसंच या Amazon प्राइम डे सेलमध्ये Echo dot (Alexa) , फायर टीव्ही आणि किंडल उपकरणांवर देखील वर्षातील सर्वोत्तम डिल्स मिळणार आहे.

​वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकव

सुपरफास्ट डिलेव्हरी

सुपरफास्ट डिलेव्हरी

Amazon या प्राइम डे मध्ये देशभरात एकदम फास्टप्रकारे डिलेव्हरी पुरवणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. भारतातील २५ शहरांमधून ऑर्डर करणाऱ्या प्राइम मेंबर्सना त्याच दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी ऑर्डर मिळणार असंही कंपनीनं म्हटलं आहे. बहुतेक टियर II शहरांमधून खरेदी करणाऱ्या प्राइम सदस्यांना २४ ते ४८ तासांच्या आत प्राइम डे डिलिव्हरी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

1 COMMENT

  1. Excellent read, I just passed this onto a friend who was doing a little research on that. And he just bought me lunch since I found it for him smile So let me rephrase that: Thanks for lunch!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here