शुभम पाटील

डेटा सेव्हर

डेटा सेव्हर हा उत्तम पर्याय आहे. मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही सर्च करून डेटा सेव्ह ऑप्शन अनेबल करून मोठ्या प्रमाणात डेटाची बचत करू शकता. या ऑप्शनमुळे बॅकग्राऊंडमध्ये वापरला जाणारा डेटा सेव्ह केला जातो. व्हिडीओज आणि इमेजेसचं आपोआप डाऊनलोडिंग थांबवलं जातं आणि मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटाची बचत केली जाते.

लिमिट बॅकग्राऊंड डेटा युसेज

या ऑप्शनचा वापर करून तुम्ही ॲपनिहाय डेटा युसेजवर नियंत्रण ठेवू शकता. यासाठी डेटा वापर मर्यादीत ठेवायचा असेल अशा अॅप्लिकेशनला सिलेक्ट करून मोबाइल डेटा अँड वायफाय ऑप्शनमधील डिसेबल बॅकग्राऊंड डेटा हा पर्याय निवडावा. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात डेटा सेव्ह होऊ शकतो.

डिसेबल मीडिया ऑटो डाऊनलोड

व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक प्रमाणात वापरलं जाणारं अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये बरेच व्हिडीओ आणि इमेजेस ऑटोमॅटिक डाऊनलोड होत असल्यानं व्हॉट्सअॅप मोठ्या प्रमाणात वापरतो. मीडिया ऑटो डाऊनलोड ऑप्शन बंद केल्यास अनावश्यक डाऊनलोड होणारे व्हिडीओज आणि इमेजेस थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचा वाया जाणाऱ्या डेटाची बचत होईल आणि अधिक वेळेसाठी तुम्ही इंटरनेट वापरू शकाल.

डेटा सेव्हर ऑप्शन

ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्लिकेशन म्हणजेच युट्यूब, हॉटस्टार, नेटफ्लिक्स इत्यादीसारखे ॲप्स व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी मोठ्या प्रमाणात डेटा वापरतात. हा डेटा सेव्ह करण्यासाठी या ॲप्समध्ये डेटा सेव्ह हा ऑप्शन असतो. हा पर्याय निवडून तुम्ही डेटा सेव्ह करू शकता.

डेटा कंट्रोल इन हॉटस्टार
तुम्ही तर हॉटस्टार हे अॅप वापरत असाल तर या अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन व्हिडीओ क्वालिटी लो करून तुम्ही इंटरनेट डेटाचा वापर मर्यादीत ठेवू शकता.

कंट्रोल डेटा युसेज इन नेटफलिक्स

नेटफ्लिक्स या ॲपमध्ये मोर टॅबमधील डेटा युसेजवर क्लिक करून तुम्ही सेव्ह ऑप्शन सिलेक्ट केला तर डेटा सेव्ह करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असू शकतो.

अनेक मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं स्वरुप लक्षात घेऊन वेगवेगळे स्वस्त इंटरनेट प्लॅन्स बाजारात आणले आहेत. त्यांचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here