नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियावर आगामी रेडमी ९ स्मार्टफोनला लाँच करण्याआधीच लिस्ट करण्यात आले आहे. शाओमीने गेल्या आठवड्यात ही माहिती दिली होती. रेडमी ९ स्मार्टफोनला भारतात २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. रेडमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती शेयर करण्यात आली आहे. आता शाओमी इंडियाच्या वेबसाइटवर इव्हेंज पेजला अपडेट करण्यात येत आहे. रेडमी नोट ९ साठी इव्हेंट टाइमचे काउंटडाऊन टाइम सुरू झाला आहे.

वाचाः

रेडमी ९ स्मार्टफोनसंबंधी खूप सारी माहिती उपलब्ध नाही. परंतु, रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रेडमी ९ सीचे एक व्हर्जन असणार आहे. यात थोडे-थोडे बदल करून लाँच केले जाणार आहे. रेडमी ९ सी ला सर्वात आधी जूनमध्ये मलेशियात लाँच करण्यात आले आहे. शाओमीने सर्वात आधी रेडमी ९ हँडसेटला जूनमध्ये स्पेनमध्ये समोर आणले होते. भारतात कंपनीने रेडमी ९ प्राईमला लाँच केले आहे.

वाचाः

गेल्या आठवड्यात टिप्स्टरने रेडमी ९ ची भारतात येणाऱ्या यूनिटची माहिती शेयर केली होती. रेडमी ९ च्या इंडिया व्हेरियंटचे काही फोटो आणि वैशिष्ट्ये लीक झाले आहेत.

वाचाः

रेडमी ९ ची संभावित वैशिष्ट्ये
टिप्स्टरच्या माहितीनुसार, रेडमी ९ मध्ये ६.५३ इंचाचा एलसीडी एचडी प्लस असणार आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 असणार आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 12 वर काम करणार आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक जी35 ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो. फोनला भरतात २ जीबी रॅम व ३ जीबी रॅम स्टोरेजमध्ये लाँच केले जावू शकते.

वाचाः

रेडमी ९ मध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये एक एलईडी फ्लॅश दिला जाणार आहे. कनेक्टिविटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी, IR ब्लास्टर आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक असू शकतात. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी असू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here