​OnePlus Nord CE 3 Lite 5G (किंमत – २१,९९९ रुपये)

​OnePlus Nord CE 3 Lite 5G (किंमत - २१,९९९ रुपये)

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन हा या यादीतील आघाडीचा फोन असून याची किंमत २१,९९९ रुपये आहे. या हँडसेटवर नो-कॉस्ट ईएमआय ऑफर देखील आहे. २००० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह देखील फोन विकत घेता येईल. फीचर्सचं म्हणाल तर
OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७२ इंचाचा डिस्प्ले आहे. स्क्रीन फुलएचडी+ रिझोल्यूशन देते. फोन Android 13.1 आधारित Oxygen OS सह येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटला पावर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी आहे.

​Samsung Galaxy M14 5G (किंमत- १४,४९० रुपये)

​Samsung Galaxy M14 5G (किंमत- १४,४९० रुपये)

सॅमसंगचा फोनही या यादीत असून Samsung Galaxy M14 स्मार्टफोन या ठिकाणी सर्वाधिक विकला जातो. याचा 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर १४,४९० रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हा हँडसेट नो-कॉस्ट ईएमआयवर घेता येईल. बँक ऑफरसह, फोनवर १,७५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा LCD फुलएचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी, २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असून एकूण ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. बॅटरीही दमदार अशी 6000mAh इतकी आहे.

Realme Narzo N55 (किंमत- १०,९९९ रुपये)

Realme Narzo N55 (किंमत- १०,९९९ रुपये)

रिअलमीचाRealme Narzo N55 स्मार्टफोन हा फोन या यादीत असून Amazon वर हा १०,९९९ रुपयांना लिस्ट केला गेला आहे. ही किंमत 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजची आहे. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर देखील आहेत. फीचर्सचं म्हणाल तर Narjo 55 स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की फोन फक्त २९ मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो. या Realme फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक रेअर कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये 90 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७२ इंच फुलस्क्रीन डिस्प्ले आहे.

​वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकव

​iQOO Z7s 5G (किंमत – १९,९९९ रुपये)

​iQOO Z7s 5G (किंमत - १९,९९९ रुपये)

​iQOO Z7s 5G हा स्मार्टफोन बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI सह मिळत आहे. Amazon वर याची किंमत १९,९९९ रुपयांना लिस्ट केला गेला आहे. iQOO Z7s 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G मोबाइल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ६.३८ इंच फुलएचडी+ Amoled डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रेअर कॅमेरा आहे. याशिवाय २ मेगापिक्सलचा बोकेह सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये 44W FlashCharge सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

लवकरच Amazon चा खास सेलही

लवकरच Amazon चा खास सेलही

तर तुम्ही आता ही लिस्ट पाहून एखादा फोन Amazon वरुन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कंपनीचा दमदार असा वार्षिक सेल काही दिवसातच आहे. Amazon Prime Day Sale १५ जुलैपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच Amazon ने या मेगा सेल Amazon Prime Day ची घोषणा केली होती. १५ जुलै २०२३ पासून सुरु होणारा हा १६ जुलैपर्यंत असेल. या सेलमध्ये स्मार्टफोनवर एकापेक्षा एक ऑफर असून एकदम स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची ऑफर दिली जाणार आहे.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here