आजकाल लॅपटॉप फारच गरजेची गोष्ट

आजकाल लॅपटॉप फारच गरजेची गोष्ट

आजकाल बहुतेक लोक लॅपटॉपवर आपली महत्त्वाची सर्व कामं करतात. बहुतांश डेटा आजकाल लॅपटॉपमध्ये साठवला जातो तसंच एज्युकेशनसह ऑफिसची अशी सारी महत्त्वाची काम यावरच होत असतात. जे ऑफिसमध्ये लॅपटॉपवरच काम करतात त्यांच्यासाठी तर लॅपटॉप सर्वात महत्त्वाचं उपकरण आहे. त्यामुळे जर काही कारणांमुळे लॅपटॉपचा वेग कमी झाला, तर संपूर्ण काम ठप्प होते. जर तुमच्या लॅपटॉपचा वेगही कालांतराने मंदावला असेल तर खाली दिलेल्या सोप्या उपायांनी तो सुधारता येईल.

जास्तीत जास्त स्टोरेज फ्री करा

जास्तीत जास्त स्टोरेज फ्री करा

जर तुमच्या लॅपटॉपचा हार्ड ड्राइव्ह पूर्ण भरत आला असेल किंवा पूर्ण भरला असेल, तर लॅपटॉपचा वेग कमी होण्याचे हे एक कारण असू शकते, त्यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या हार्ड ड्राइव्हवर मोठ्या आकाराच्या किंवा फारशा महत्त्वाच्या नसलेल्या फाइल्स लगेचच डिलीट करा आणि
जास्तीत जास्त स्टोरेज फ्री करा.

लॅपटॉप वेळच्या वेळी स्कॅन करा

लॅपटॉप वेळच्या वेळी स्कॅन करा

जर तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आला तर त्यामुळे लॅपटॉपच्या स्पीडवरही परिणाम होऊ शकतो. तुमचा लॅपटॉप दररोज व्हायरससाठी स्कॅन करा आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट वापरा. एक चांगला अँटीव्हायरस प्रोग्राम तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवेल आणि तुमची सिस्टीम स्लो करू शकणारे व्हायरस आणि मालवेअर काढून टाकेल.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकव

लॅपटॉपची मेमरी वाढवा

लॅपटॉपची मेमरी वाढवा

तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढवण्यासाठी सर्व सिस्टीम अपडेट्स नियमितपणे तपासा आणि अपडेट करा. सॉफ्टवेअर कायम अपडेटेड ठेवणं फारच गरजेचं आगे. तसेच, तुमच्या लॅपटॉपमध्ये अधिक रॅम मेमरी जोडण्याचा विचार करा. कारण रॅम जितका जास्त तितकं काम फास्ट होतं. त्यामुळे लॅपटॉपची स्पीड वाढवण्यासाठी रॅम क्लिअर ठेवणं महत्त्वाचं आहे.
​वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

​स्टार्टअप प्रोग्रामवरही लक्ष ठेवा

​स्टार्टअप प्रोग्रामवरही लक्ष ठेवा

स्टार्टअपच्या वेळी तुमच्या लॅपटॉपमध्ये जितके कमी प्रोग्रॅम असतील तितका तुमचा लॅपटॉप वेगवान होईल. लॅपटॉप सुरू करताना, लक्षात ठेवा की फक्त आवश्यक प्रोग्राम सुरू राहतील. तर या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर, तर तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडमध्ये नक्कीच थोडी वाढ होईल.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स


Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here