मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स

मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स

बहुतेक बनावट स्मार्टफोन्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स
नसतात. तसेच, अनेक वेळा बनावट मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स देखील टाकले जातात. अशा परिस्थितीत स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी फोनचे अधिकृत कागदपत्र तपासून घ्यावेत. तसेच, अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते तपशील जुळत आहेत का? ते देखील चेक करावे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स

​फोन खरेदी करण्यापूर्वी त्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स तपासले पाहिजेत. जसे की प्रोसेसर, रॅम, स्टोरेज, कॅमेरा आणि इतर तंत्रज्ञानाची माहिती मिळवावी. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर किंवा इतर अधिकृत सोर्सद्वारे ही वैशिष्ट्ये क्रॉस-वेरिफाय केली पाहिजेत.

वाचा : Amazon Prime Day Sale मध्ये एकापेक्षा एक भन्नाट डिल्स, पाहा Smartphone वरील खास डिस्काउंट ऑफर्स

​ऑपरेटिंग सिस्टम

​ऑपरेटिंग सिस्टम

स्मार्टफोनमध्ये, तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम चेक करु शकता. एकतर Android, iOS असे प्रकार ऑपरेटिंग सिस्टमचे असतात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन हे तपासू शकता. बनावट स्मार्टफोनमध्ये प्रमाणित ऑपरेटिंग सिस्टम किंवा प्रकार नसतात. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टमही फोन चेक करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकव

IMEI नंबर चेक करा

IMEI नंबर चेक करा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबर तपासू शकता. तुम्ही तुमच्या डायलरवर “*#06#” डायल करून किंवा तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन IMEI नंबर पाहू शकता. यानंतर, तुम्ही वेबसाइटद्वारे IMEI नंबरची सत्यता तपासू शकता. प्रत्येक फोनचा एक विशिष्ट आणि वेगळा
IMEI नंबर असतो.

​वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

खरेदी करणाऱ्या सेलरची चौकशी

खरेदी करणाऱ्या सेलरची चौकशी

तुम्ही तुमचा स्मार्टफोन ऑनलाइन किंवा एखाद्या दुकानातून ऑफलाईन खरेदी करत असल्यास, तुम्ही खरेदीदाराची पडताळणी करावी. तुम्हाला विक्रेता, वेबसाइट, स्टोअरचे रिव्ह्यूय, ग्राहक सेवा आणि त्यांची उपलब्धता याबद्दल माहिती मिळवणं फारचं गरजेचं आहे.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here