नवी दिल्लीः वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड () चा आज फ्लॅश सेल आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा फोन खरेदी केला नसेल तर आज पुन्हा एकदा तुम्हाला हा फोन खरेदीची संधी मिळणार आहे. या फोनचा सेल आज दुपारी १ वाजता अॅमेझॉनवर सुरू होणार आहे. वनप्लसचा हा फोन सध्या खूप चर्चेत आहे. प्राईम डे सेलमध्ये या फोनची खूप विक्री झाली.

वाचाः

वनप्लस नॉर्डची किंमत

फोनमध्ये ६ जीबी रॅम पासून १२ जीबी रॅम पर्यंत ऑप्शन देण्यात आले आहेत. वनप्लसचा हा फोन अफॉर्डेबल स्मार्टफोन OxygenOS 10.5 वर बेस्ड अँड्रॉयड १० वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वनप्लसचा नॉर्ड स्मार्टफोन 6GB रॅम+64GB स्टोरेज, 8GB रॅम+128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+256GB स्टोरेज या तीन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतात ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचे व्हेरियंट केवळ लाँच करण्यात आले आहे. याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
वनप्लस नॉर्ड मध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. फोनच्या बॅक आणि फ्रंटमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. जे स्क्रॅच आणि क्रॅक होण्यास प्रोटेक्ट करते.

वाचाः

फोनमध्ये ४ रियर कॅमेरे
वनप्लस नॉर्डच्या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे देण्यात आले आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच फोनच्या मागे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here