नवी दिल्लीः स्मार्टफोनला आज सेलमध्ये खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. सेलला आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सेलला सुरूवात होणार आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

किंमत आणि ऑफर
पोको एम२ प्रो भारतात तीन व्हेरियंट मध्ये येतो. ४ जीबी प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. आज या सेलमध्ये फोन खरेदीवर काही ऑफर्स दिल्या आहेत. या फोनला अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास फोनवर ५ टक्के सूट दिली जाणार आहे. जर या फोनला खरेदी करताना फेडरल बँकेच्या डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. फोनला आकर्षक नो – कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येवू शकते. नो कॉस्ट ईएमआयची सुरुवात १६६७ रुपये प्रति महिना आहे.

वाचाः

वाचाः

Poco M2 Pro ची वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो 20:9 के आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम पर्यंत आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 11 ओएसवर फोन काम करतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोडसोबत १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंगसोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here