नवी दिल्लीः वनप्लसने गेल्या महिन्यात स्वस्त फोन लाँच केला होता. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, आता कंपनी आणखी स्वस्त फोन मार्केटमध्ये आणणार आहे. आता ही माहिती समोर आली आहे की, कंपनी एक नवीन स्वस्त फोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. याची किंमत वनप्लस नॉर्ड पेक्षा कमी असणार आहे. या फोनची किंमत १८ हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कंपनी या फोनला पुढील महिन्यात लाँच करू शकते.

वाचाः

स्नॅपड्रॅगन ६६२ सोबत येवू शकतो फोन
लीक झालेल्या माहितीनुसार, वनप्लसचा हा फोन स्नॅपड्रॅगन ६६२ सोबत येवू शकतो. परंतु, हे कंपनीकडून अद्याप अधिकृत सांगण्यात आलेले नाही. एका रिपोर्टच्या माहितीनुसार या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिली जावू शकते. या फोनसंबंधी अन्य माहिती समोर आली नाही. ही चिपसेट जानेवारी २०२० मध्ये लाँच करण्यात आली होती. नुकताच याचा वापर Moto G9 मध्ये करण्यात आला आहे.

वाचाः

वनप्लस नॉर्ड कंपनीचा
कंपनीने गेल्या महिन्यात वनप्लस नॉर्ड फोन लाँच केला होता. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन आहे. वनप्लस नॉर्ड ८ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

वनप्लस नॉर्ड मध्ये 765G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस फ्लूड अमोलेड स्क्रीन दिली आहे. याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज़ आहे. हँडसेटमध्ये ६, ८, आणि १२ जीबी रॅम आहे. फोनमध्ये २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरे दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4115mAh बॅटरी दिली आहे. हँडसेट अँड्रॉयड 10 बेस्ड ऑक्सीजन ओएस 10.5 वर चालतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here