नवी दिल्लीः HMD Global ने मंगळवारी भारतात आपले चार नवीन हँडसेट लाँच केले आहेत. फिनलँडच्या कंपनीने देशात ब्रँड अंतर्गत , , आणि ला बाजारात उतरवले आहे. नोकिया 5.3 आणि नोकिया C3 स्मार्टफोन आहे. तर नोकिया १५० आणि नोकिया १२५ हे दोन फीचर फोन आहेत. कंपनीचा दावा आहे की, नोकिया सी ३ ला सर्वात आधी भारतात लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

Nokia 5.3 आणि Nokia C3:ची किंमत
नोकिया ५.३ च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. नोकियाचा हा हँडसेट स्यान, सँड आणि चारकोल कलरमध्ये येतो. याची विक्री १ सप्टेंबरपासून देशात सुरू करण्यात येणार आहे. फोनसाठी आजपासून प्री बुकिंग करता येवू शकते.

नोकिया सी३ च्या २ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. नोकिया सी३ नॉर्डिक ब्लू आणि सँड कलरमध्ये येतो. याची विक्री १७ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. फोनची प्री बुकिंग १ सप्टेंबर पासून सुरू होमार आहे.

वाचाः

Nokia 5.3: चे वैशिष्ट्ये
नोकियाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (1600×720 पिक्सल) स्क्रीन आहे. स्क्रीनवर वॉटरड्रॉप नॉच आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी तसेच इनबिल्ट ६४ जीबी स्टोरेज हे पर्याय आहेत. नोकिया५.३ स्टॉक अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये कंपनी दोन वर्षासाठी अँड्रॉयड अपग्रेड्स आणि ३ ग्लास साठी सिक्योरिटी अपडेट्स देते. हँडसेटला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. रियर कॅमेरा नाइट मोड, पोर्ट्रेट मोड आदी सपोर्ट करते.

वाचाः

Nokia C3:चे वैशिष्ट्ये
मेड इन इंडिया स्मार्टफोन म्हणून नोकिया सी३ चा प्रचार केला जात आहे. नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आहे. फोनमध्ये Unisoc sc9863a प्रोसेसर दिला आहे. २ जीबी आणि ३ जीबी रॅम पर्याय आहे. फोनमध्ये १६ जीबी व ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे.

नोकिया सी३ मध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 3040mAh रिमूवेबल बॅटरी दिली आहे. फोन २जी नेटवर्कवरर ५० तास, ३ जी नेटवर्कवर २३ तासांपर्यंत टॉक टाईम आणि २ जीवर २२ तासांपर्यंत टॉकटाईम मिळतो, असा कंपनीचा दावा आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  3. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here