नवी दिल्लीः मोबाइल ग्राहकांसाठी एक बॅड न्यूज आहे. लवकरच त्यांना रिचार्जसाठी दुप्पट किंमत द्यावी लागणार आहे. भारती एअरटेलचे फाउंडर व चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी आगामी टॅरिफ महाग केला जाण्याचे संकेत देत ते म्हणाले की, ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागू शकते. जर सध्या एखादा ग्राहक महिन्याला ४५ रुपये देत असेल तर त्याला लवकरच १०० रुपये मोजावे लागू शकतात.

वाचाः

१०० रुपयांत मिळणार १ जीबी डेटा
ग्राहकांना १६० रुपयात १.६ जीबी डेटा मिळू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त किंमत देण्यासाठी तयार राहावे लागू शकते. मित्तल यांनी सांगितले की, आम्हाला यूएस किंवा यूरोपसारखे ५० किंवा ६० डॉलर नाही पाहिजे. परंतु, १६० रुपयांत १६ जीबी डेटा प्रति महिना देणे हे जास्त दिवस चालणारे नाही. त्यांनी सांगितले की, युजर्सला या किंमतीत किंवा १.६ जीबी डेटा मिळायला हवे किंवा डेटाची किंमत वाढवावी लागेल. याचा सरळ अर्थ आहे की, आता १० रुपयात मिळणाऱ्या १ जीबी डेटासाठी १०० रुपये मोजावे लागतील.

वाचाः

सध्या किंमत किती
एअरटेल १९९ रुपयात २४ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा ऑफर करीत आहे. मित्तल यांच्या वक्तव्यानुसार, येणाऱ्या काळात डेटा बेनिफिट्स १० पट कमी होऊन २.४ जीबी होईल. तसेच मिनिमम रिचार्जची किंमत कमीत कमी १०० रुपये महिना होईल. सध्या एअरटेलच्या बेस प्लानची किंमत ४५ रुपये महिना आहे.

वाचाः

रिवेन्यू वाढवण्याची गरज
सुनिल मित्तल यांनी सांगितले की, इंडस्ट्रीला स्थिर बनवण्यासाठी ३०० रुपयांची एव्हरेज रिवेन्यू वर युजर (ARPU) ची गरज आहे. पुढील सहा महिन्यात आम्ही २०० रुपये (ARPU) स्तराला निश्चित करण्यासाठी पोहोचू. तसेच २५० रुपये साधारणपणे एआरपीयू असेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here