नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर विवोकडून Y-सीरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. कंपनीने आज स्मार्टफोन लाँच केला आहे. पॉवरफुल रियर कॅमेरा सेटअप आणि दमदार 5000mAh बॅटरीचे स्मार्टफोनचे सेल सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेल्सवर २८ ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. कंपनीने हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आणला आहे. तसेच विवो कमी किंमतीत उतरवण्यात आले आहे. कंपनी हे डिव्हाईसेज मेक इन इंडिया च्या सोबत ग्रेटर नोएडा मध्ये बनवण्यात येणार आहे.

वाचाः

Vivo Y20 आणि Y20i ची किंमत
कंपनी नवीन Y20 स्मार्टफोन ला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत येणार आहे. याची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे. या स्मार्टफोनला दोन कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. Vivo Y20i ला ११ हजार ४९० रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. फोनचा पहिला सेल २८ ऑगस्ट आणि दुसरा Y20i चा सेल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

वाचाः

Vivo Y20 आणि Y20i
विवोचा नवीन Y20 स्मार्टफोन मध्ये ६.५१ इंचाचा Halo iView डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 दिला आहे. एचडी+ (1600×720) रेजॉलूशन दिला आहे. स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. याच्या मदतीने केवळ ०.२२ सेकंदात अनलॉक होतो. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि तिसरा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. दोन्ही फोनमध्ये एकसारखेच वैशिष्ट्ये दिले आहेत. Y20 आणि Y20i दोन्हीत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला आहे. Vivo Y20i मध्ये मोठी बॅटरी ट्रिपल कॅमेरा आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here