नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच एम सीरीज मध्ये नवीन फोन लाँच करणार आहे. नवीन शी संबंधित लिक्स आणि डिटेल्स गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. फोन पॉवरफुल वैशिष्ट्यांसह येवू शकतात. 7000mAh बॅटरी सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अॅमेझॉन इंडियावर अधिकृत टीज करण्यात आली आहे. फोनला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाँच केले जावू शकते.

वाचाः

शॉपिंग प्लॅटफॉर्मवर दिसत असलेली मायक्रोसाइट वरून हे स्पष्ट झाले आहे की, लवकरच मार्केटमध्ये असणार आहे. कंपनीने यासोबत ‘Meanest Monster Ever’टॅगलाइन शेयर केली आहे. आणखी एक इमेज दिसत असून फोनच्या फ्रंटला इनफिनिटी ओ डिस्प्ले सेंटर मध्ये पंच होल डिझाईन सोबत मिळणार आहे. Galaxy M51 लाँच डेटची माहिती अद्याप समोर आली नाही. पुढील महिन्यात या फोनला मार्केटमध्ये उतरवले जावू शकते.

वाचाः

असे असतील फीचर्स
गेल्या रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, Galaxy M51 मध्ये ६.६७ इंचाचा S-AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. यात फुल एचडी प्लस रेजॉलूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 386ppi पिक्सल डेंसिटी तसेच 420nits पीक ब्राइटनेस ऑफर करणार आहे. नवीन सॅमसंग फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर मिळणार आहे.

वाचाः

चार रियर कॅमेरा सेटअप
रियर पॅनेलवर फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. सेटअपमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन सेन्सर असू शकतो. १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळू शकतो. फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे.

वाचाः

बंपर 7000mAh बॅटरी
फोनमध्ये जबरदस्त फीचरसोबत बंपर 7000mAh बॅटरी असणार आहे. या पॉवरफुल बॅटरीसोबत युजर्सला 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यूएसबी सी पोर्टच्या मदतीने दिला जावू शकतो. फोनच्या साइडमध्ये फिंगरप्रिंट रिडर दिला जावू शकतो. फोन ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये उतरवला जावू शकतो. या फोनची किंमत २५ हजार ते ३० हजार रुपयांदरम्यान असू शकते.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here