वाचाः
Realme 7 Pro चे वैशिष्ट्ये
टिप्स्टर मुकुल शर्मा यांच्या माहितीनुसार, रियलमी ७ प्रो स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. या फोनचे 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन असणार आहे. सेल्फीसाठी कॅमेऱ्यात डिस्प्लेत पंच होल दिला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर वर काम करणारा हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येईल. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे.
वाचाः
कसा असेल कॅमेरा
या फोनमध्ये देण्यात येणारा कॅमेरा कसा असणार आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. जो एक Sony IMX682 सेंसर आहे. तसेच या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. जो ८५ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूचा लेन्स असणार आहे.
वाचाः
भारतातील सर्वात जास्त फास्ट चार्जिंग
कंपनीच्या टीझरमधून ही माहिती उघड झाली आहे. की, फोनची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सोबत येणार आहे. रियलमीच्या माहितीनुसार, ही भारतातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. तसेच या फोनमध्ये ड्यूल स्टीरियो स्पीकर्स मिळू शकतात.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times