शुभम पाटील

सध्या लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन दिसतात. त्याशिवाय इतर गॅजेट्सही अगदी सहज हाताळली जात आहेत. या गॅजेट्समध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे . किंवा इअर प्लग्स कनेक्ट करण्यासाठी ब्लुटूथचा प्रामुख्यानं वापर होतो. याशिवाय ब्लुटूथचा अनेक कामांसाठी उपयोग होतो हे तुम्हाला माहीत आहे का? ब्लुटूथचा उपयोग करून आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याची माहिती घेऊ या…

ब्लुटूथ टेथरिंग

ब्लुटूथ टेथरिंग उपयुक्त असून या तंत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाइलचं इंटरनेट लॅपटॉपसाठी देखील वापरू शकता. म्हणजेच यापुढे वायफाय बंद पडल्यास ब्लुटूथचा वापर करून तुम्ही मोबाइल इंटरनेट लॅपटॉपवर वापरु शकता.

फाइल करा ट्रान्स्फर

दोन फोन ब्लुटूथने कनेक्ट करून फाइल शेअर केल्या असतील. याप्रकारे तुम्ही ब्लुटूथचा वापर करून लॅपटॉप किंवा ब्लुटूथ अनेबल्ड पीसीला कनेक्ट करून फाइल शेअर करू शकता. या शेअरिंगचा वेग कमी असेल. पण, तुमच्याकडे डेटाकेबल नसेल तर फाइल ट्रान्सफरसाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो.

मल्टी प्लेअर गेम्स

काही गेम्समध्ये एकापेक्षा जास्त खेळाडू एकत्र येऊन गेम खेळू शकतात. अशा वेळेस तुमचे स्मार्टफोन्स ब्लुटूथने कनेक्ट करून एकत्रत खेळू शकता.

इतर उपकरणांना जोडा

ब्लुटूथ मुख्यत्वे करून दुसरी उपकरणं कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. यात तुम्ही अगदी माऊस, कीबोर्ड, प्रिंटर्स, गेमपॅडसारख्या उपकरणांना कनेक्ट करून विविध कामं अगदी सहज पूर्ण करू शकता.

सुरक्षिततेच्यादृष्टीनं उपयोगी

सध्याच्या स्मार्टहोम्सचे दरवाजे ब्लुटूथच्या मदतीनं बंद किंवा उघडता येतात. यासोबतच ब्लुटूथमध्ये अलार्म सिस्टिमची देखील सोय केलेली असते. जेणेकरून, मोबाइलचा वापर करून ब्लुटूथच्या मदतीनं घराला सुरक्षित ठेवू शकता.

गाडीला कनेक्ट करायचंय?

स्मार्टफोन चारचाकीला कनेक्ट करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? ब्लुटूथच्या मदतीनं फोन गाडीला कनेक्ट करुन कॉल घेणं, मेसेज मोठ्या आवाजात ऐकणं आणि नेव्हिगेशनची मदत घेऊ शकता.

वायरलेस रिमोट

सध्या अनेक टीव्ही आणि डिशच्या रिमोटमध्ये ब्लुटूथ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एवढंच नाही तर मोबाइल ब्लुटूथचा वापर करून टीव्हीला मोबाइल कनेक्ट करू शकता.

त्यामुळे ब्लुटूथचं तंत्र जुनं असलं तरीही त्यात अद्ययावत प्रणाली येत आहे. याचा वापर करुन दैनंदिन कामं सहज करु शकतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here