Twitter Viral News: आजकालच्या युगात जोडप्यांमधील गमतीशीर किस्से सोशल मीडियावर (Social Media) फार व्हायरल होतात. असंच एका जोडप्यामधील संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. नुकतंच ट्विटरने (Twitter) आपलं नाव आणि लोगो बदलून ‘X’ ठेवला आहे. ट्विटर युजर्सकडून ब्लू टिकसाठी पैसे देखील आकारतो, ज्यासाठी महिन्याला 700-800 चा खर्च येतो. आता ट्विटरने बदललेल्या त्यांच्या नावाने एका जोडप्याची मात्र गोची झाली आहे. ‘X’ या नावामुळे नवरा-बायकोमध्ये वादाची ठिणगी पेटायचीच बाकी होती.

नेमकं घडलं काय?

आता गोष्ट अशी आहे की, एका ब्लू टिक ट्विटर युजरच्या खात्यातून ठराविक रक्कम कट झाली. त्याने ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सब्सक्रिप्शन घेतलं होतं. युजरच्या बँक खात्याचं स्टेटमेंट त्याच्या बायकोनं पाहिलं असता तिला “X Premium’ साठी तिच्या नवऱ्याच्या खात्यातून 8 डॉलर्स कट झाल्याचं दिसलं. त्यावर तिला संशय आला की, तिचा नवरा त्याच्या Ex ला दर महिन्याला पैसे तर देत नाही ना? आणि म्हणून तिने बँक स्टेटमेंटचा स्क्रिनशॉट तिच्या नवऱ्याला पाठवून ‘हे नेमकं काय आहे?’ असं विचारलं. त्यावर नवरा म्हणतो, आता याचं स्पष्टीकरण मी तुला कसं देऊ?

ट्विटर युजरने बायको आणि त्याच्यातलं संभाषण ट्विटरवरच पोस्ट केलं आहे, ज्याला त्याने मजेशीर कॅप्शन दिलं आहे की, “माझ्या बायकोने आताच मला असा मेसेज केला आहे, कदाचित आज रात्री मला सोफ्यावरच झोपावं लागणार आहे.”

ट्विटरवर संभाषणाची पोस्ट प्रचंड व्हायरल

ट्विटर युजर अ‍ॅलेक्स कोहेन याने 6 ऑगस्ट रोजी हे संभाषणाचं ट्विट केलं आहे. नेटकरी देखील हा प्रकार पाहून भांबावून गेले आहेत आणि त्यांना हे गमतीदार वाटलं. अ‍ॅलेक्स कोहेनचं हे संभाषण ट्विटरवर चांगलंच व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत 1,07,000 लाईक्स, 6,598 रिपोस्ट, 3,823 कमेंट आले आहेत, ज्याची संख्या पुढे वाढतच चालली आहे. बऱ्याच जणांनी या पोस्टच्या कमेंटमध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विटर ब्लू टिक असलेल्या कंटेंट क्रिएटर्सला देत आहे पैसे

ट्विटरच्या नवीन अपडेटसह ट्विटरने आता कंटेंट क्रिएटर्सला आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्यासही सुरुवात केली आहे. जे ट्विटरवर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात आणि ट्विटरवर मिम्स, व्हिडीओ किंवा माहिती सातत्याने शेअर करतात, अशा लोकांना ट्विटर पगार देत आहे. युट्युब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे ट्विटरनेही आता क्रिएटर्सना पेआऊट देणं सुरू केलं  आहे. अशाच एका ट्विटर युजरने त्याच्या अकाऊंटवर ट्विटरने टाकलेल्या रकमेचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यावर “ब्लू टिक के पैसे वसुल” असं मजेशीर कॅप्शन देखील त्यानं दिलं आहे.

हेही वाचा:

Twitter: इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात होणार लढत! ट्विटरवर लाईव्ह पाहता येणार सामनाtechnology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here