ओकि
या कंपनीनं नुकतंच मेड इन इंडियाच्या अंतर्गत आपल्या कंपनीचे टेलिव्हिजन सेट्स बाजारात आणले आहेत. २४ ते ६५ इंच आकारांमध्ये हे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यामध्ये इन-बिल्ट साऊंड बार दिला गेला आहे. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या थिएटरसारखा अनुभव मिळू शकतो. सध्या हे टेलिव्हिजन सेट्स महाराष्ट्र आणि इतर सात राज्यात उपलब्ध झाले आहेत. ओकि एलईडी टीव्हीची किंमत ६,५०० रुपयांपासून सुरु होत असून ३२ इंची स्मार्ट टीव्हीची किंमत ११,१११ रुपये ठेवण्यात आली आहे.
वाचाः
ओनिडा
ओनिडा कंपनीने १९८१ सालापासून टेलिव्हिजन सेट्स बनवण्यास सुरुवात केली. सध्या ही कंपनी ३४ लाखांहून अधिक टेलिव्हिजन सेट्स बनवत आहे. सध्याच्या काळात लोकप्रिय असणारे एलइडी टीव्ही+फायर टीव्हीसुद्धा ही कंपनी बनवते. आपल्या बजेटनुसार ग्राहकांना साधारण १२ हजारांपासून ते अगदी ९९ हजार रुपयांपर्यंत टेलिव्हिजन सेट्स खरेदी करता येऊ शकतील.
वाचाः
व्हिडीओकॉन
१९७९ साली ही भारतीय कंपनी सुरु झाली. ही टेलिव्हिजनसाठी लागणारी पिक्चर ट्यूब बनवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. व्हिडीओकॉन कंपनीच्या भारतात १७ साइट्स आहेत. काळानुसार होणारे बदल स्वीकारत आणि अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करत कंपनीने एलइडी आणि स्मार्ट टीव्ही बाजारात आणले आहेत. या कंपनीच्या टीव्हींची किंमत १२ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
वाचाः
टी-सीरिज
गुलशन कुमार यांनी सुरु केलेल्या टी-सीरिज या कंपनीनं संगीत क्षेत्रात नाव कमावलं आहे. ही कंपनी आता टेलिव्हिजन सेट्ससुद्धा बनवते. नुकतंच या कंपनीने तीन नवीन मॉडेल्स बाजारात आणले आहेत. ८० ते ९८ सेमी आकाराचे आणि परवडतील अशा किमतीत बाजारात आणण्यात आले आहेत.
वाचाः
मायक्रोमॅक्स
२००८ साली सुरु झालेली मायक्रोमॅक्स ही भारतातील मोबाइल फोन बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. त्याच बरोबर आता ही कंपनी टीव्हीसुद्धा बनवायला लागली आहे. या कंपनीचे एलइडी आणि स्मार्ट टीव्ही हे थिएटरसारखा अनुभव देतील असं कंपनीचं म्हणणं आहे.
वाचाः
इंटेक्स
इंटेक्स कंपनीची १९९६ साली स्थापना झाली. सुरवातीला आयटी आणि मोबाइलसाठी लागणाऱ्या अॅक्सेसरीज बनवणारी कंपनी अशी ओळख होती. आता मात्र या कंपनीचे टेलिव्हिजन सेट्ससुद्धा उपलब्ध आहेत. हल्लीच कंपनीने एक फुल्ल एचडी स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times