नवी दिल्लीः सीमेवर भारत-चीन तणावानंतर केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर अनेक भारतीय अॅपला देशवासीयांकडून पसंती मिळताना दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘’ या कार्यक्रमातून काही देशांतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण अॅपचा उल्लेख केला होता. त्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन दिवसांत त्यातील अनेक अॅप हे ‘प्ले स्टोरवर’ टॉप १० श्रेणीत आल्या्चे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतीय बनावटीच्या अॅप्सना अधिक प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

वाचाः

भारतीय बनावटीचे जे अॅप मध्ये टॉप १० श्रेणीत आले आहेत त्यात सोशल कॅटगिरीत प्रामुख्याने ‘जोश’, ‘स्नॅपचॅट’, ‘शेअरचॅट’, ‘मोज’, ‘रोपोसो’, आणि ‘चिंगारी’ या अॅपचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एपी सरकार सेवा, दृष्टी, सरलडेटा, व्हूत किड्स, पंजाब एज्युकेअर, डाउटनट, कुतुकी किड्स नव्याने पसंतीचे ठरले आहे. हेल्थ आणि फिटनेस कॅटगरी मध्ये आरोग्य सेतु अॅपच्या खालोखाल स्टेपसेटगो, होमवर्कआउट, लॉस वेट अॅप फॉर मेन, इन्क्रीज हाइट वर्कआउट, सिक्स पॅक्स इन थर्टी डेज इत्यादी अॅपचा समावेश आहे. गेल्या आठवड्यातील मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय जनतेला देशी बनावटीचे अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते. आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देण्यासोबतच या अॅप्सची चाचणी करून सध्याच्या लोकप्रिय असलेल्या विदेशी कंपन्यांच्या अॅपला पर्याय उपलब्ध करून देण्याचा हेतू यामागे आहे. विदेशी अॅप हे सुरक्षेच्या दृष्टिने विश्वासार्ह नसल्याचे दिसून आले आहे.

वाचाः

वाचाः

मोदींनी त्यांच्या भाषणातून ‘कू’, स्टेपसेटगो’, ‘चिंगारी’, ‘कुतुकी’,’एफटीसी टॅलेंट’ या अॅप्सचं कौतुक केलं आहे.‘आत्मनिर्भर अॅप इनोवेशन चॅलेंज’च्या माध्यमातून देशभरातून ७ हजार उत्कृष्ट अॅपची निवड करण्यात आली होती. त्यात गेमिंग, मनोरंजन, बिझनेस, युटिलिटी, सोशल मीडिया आणि फिटनेस कॅटगरीचा समावेश होता. ‘पुढील गुगल, फेसबूक आणि ट्विटरचा भारतातून जन्म होणार आहे.या साइट्ची जागा भारतात तयार करण्यात आलेल्या साइट्सनी घ्यावी, हे आमचं अंतिम उद्दिष्ट्य आहे. भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण अॅप्सची भविष्यात जगाला दखल घ्यावीच लागणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here