नवी दिल्लीः येत्या काही दिवसात भारतात महाग होऊ शकतात. याचे मोठे कारण समोर आले आहे. स्मार्टफोन्स पार्ट्स निर्यात करणारी कंपन्यांकडून की-कंपोनेंट्सच्या किंमतीत १५ टक्के वाढ केली आहे. यामुळे आगामी काही दिवसात स्मार्टफोन्सच्या किंमतीत २५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन फोनची किंमत वाढू शकते. तसेच याचा परिणाम फेस्टिव सीजनमध्ये पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचाः

वाचाः

भारतात टॉप पोझिशनवर असलेली चायनीज कंपनी शाओमी, विवो, ओप्पो, रियलमी आणि वनप्लस फेस्टिव सीजनमध्ये सर्वात जास्त सेल करण्याची अपेक्षा आहे. फेस्टिव सीजनची उत्सूकता कंपन्यांना तसेच ग्राहकांना सुद्धा आहे. परंतु, यावेळी स्मार्टफोन महाग होणार असल्याने फोनवर डिस्काउंट ग्राहकांना मिळण्याची शक्यता कमीच आहे. कंपन्या आतापासूनच इन्वेंटरी तयार करीत आहे. तसेच डिव्हाईसेजचे प्रोडक्शन वाढवले आहे.

वाचाः

वाचाः

स्मार्टफोन किती महाग होणार
हाँगकाँग बेस्ड ब्रँड Nuu Mobiles च्या ग्लोबल सेल्स डायरेक्टर नूर अली जहगीर यांनी सांगितले की, चीनमध्ये LCD/LEDs सप्लायर्सकडून कमीत कमी १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचाचा अर्थ ५ इंच आणि ५.५ इंचा पर्यंत स्क्रीन स्मार्टफोन आणि ७ इंचाच्या टॅबलेट स्क्रीन साईजेसची किंमत ३-४ डॉलर (जवळपास ३०० रुपये) पर्यंत वाढू शकते. त्यामुळे स्वस्त फोनची किंमत १५० ते २०० रुपये आणि महागड्या फोनची किंमत ३८० ते ४०० रुपयांपर्यंत वाढू शकते.

वाचाः

वाचाः

डिस्काउंट मिळणार नाही
पार्ट्स महाग झाल्याने स्मार्टफोनची किंमत वाढू शकते. त्यामुळे फेस्टिव्ह सीजनमध्ये आधी सारखे डिस्काउंट आणि ऑफर्स ग्राहकांना मिळण्याची शक्यता कमीच आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here