नवी दिल्लीः जगात सर्वात मोठ्या मेसेजिंग अॅप ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान WhatsApp चे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यामुळे तुमची चॅटिंग सुरक्षित राहावी असे अनेकांना वाटते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ४ जबरदस्त सेटिंग्स सांगणार आहोत. हे अॅक्टिव केल्या तुमची चॅटिंग कुणीच वाचू शकणार नाही.

वाचाः

वाचाः

टू-स्टेप ऑथेंटिकेशन

ही सेटिंग आपल्या व्हॉट्सअॅपवर सिक्योरिटीची एक्स्ट्रा लेयर लावते. या ठिकाणी तुम्हाला एक पिन सेट करावी लागेल. जी तुम्हाला कधीही विचारू शकते. जर कोणी अज्ञात व्यक्तीच्या हातात तुमचा मोबाइल पडला तर त्याला ही चॅटिंग वाचता येवू शकणार नाही. त्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जावून अकाउंटवर जावून Two-Step verification वर टॅप करावे लागेल. या ठिकाणी Enable वर क्लिक करून Pin सेट करा.

Read Receipts बंद करा

या फीचरचा फायदा आहे की तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचला आहे की नाही, हे समजत नाही. मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक होत नाही. तसेच व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये जावून अकाउंटमध्ये जा. या ठिकाणी प्रायव्हसीच्या आत Read Reciepts चा पर्याय दिसेल. याला टर्न ऑफ करा.

फिंगरप्रिंट लॉकचा वापर करा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशिवाय व्हॉट्सअॅपला सुद्धा फिंगरप्रिंट लॉकचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जावू प्रायव्हसी ऑप्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी खाली दिलेल्या Fingerprint Lock चा ऑप्शन दिसेल. याला इनेबल करा. आता कुणीही तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करू शकणार नाही.

चॅट बॅकअप करा बंद

चॅट बॅकअप घेण्याचा फायदा असतो. तुमचे चॅट डिलीट केल्यानंतर ते परत मिळवता येते. परंतु, गुगल आणि अॅपल अकाउंट्सवर ते सेव्ह होतात. त्यामुळे ते हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे चॅट ऑटो बॅक अप बंद करा. यासाठी सेटिंगमध्ये जा. त्यानंतर चॅट्स ऑप्शन निवडा. या ठिकाणी Chat Backup वर क्लिक करा आणि Backup to Google Drive मध्ये जावून Never सिलेक्ट करा.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here